शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचा कालवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:33 IST

नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली.

ठळक मुद्देनिधीअभावी कामे रखडली : ओलितासाठी पाणी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. हा कालवा जलाशयापासून पारशिवनी, रामटेक, मौदामार्गे भंडारा जिल्ह्यात जातो. मागील ३७ वर्षांत या कालव्याची एकदाही प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय वाढला असून, दुसरीकडे शेतकºयांना ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातच निधीअभावी कालवा दुरुस्तीची कामे रखडल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागातील अधिकारी देतात.पेंच जलाशय हे नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले होते. या जलाशयातील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी तसेच कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला विजेच्या उत्पादनासाठी पाणी दिले जाते; शिवाय पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठीही पाणी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी डावा आणि उजवा अशा दोन मुख्य कालव्यांची १९८० मध्ये निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही.या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अधूनमधून निधी मंजूर केला. परंतु, भ्रष्टाचारामुळे या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी, मुख्य कालव्यांच्या भिंतीवर ठिकठिकाणी झुडपे वाढली असून, त्यांच्या मुळांमुळे भिंतीला तडा जाऊ लागल्या. एवढेच नव्हे तर खेकड्यांनी भिंती पोखरल्याने कालव्यातील पाणी झिरपण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रमाणही वाढत गेले.अभियंत्यांनी केली पाहणीपेंच लाभक्षेत्राचे मुख्य अभियंता आर. एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, उपविभागीय अभियंता आर. एम. धोटे यांनी या कालव्याची व वितरिकांची नवरगाव जंक्शन, रामटेक, निमखेडा, खात, शहापूर, सातोना, रेवराळ, नेरी, मौदा, भंडारा या भागात पाहणी केली. कालव्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी मिळाले की नाही, याचीही या अभियंत्यांनी चौकशी केली. त्यांना प्रत्येक ठिकाणी कालव्याची दुर्दशा दिसून आली. परंतु, दुरुस्तीबाबत विचारणा केल्यावर या अभियंत्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. ही पाहणी कालव्याच्या दुरुस्तीसाठी नसून, शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.