शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिओला अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

भिवापूर : काही कामानिमित्त चिमूर येथे गेलेल्या भिवापूर येथील तरुणांच्या स्कॉर्पिओला परतीच्या प्रवासात अपघात झाल्याने यात चालक ठार तर ...

भिवापूर : काही कामानिमित्त चिमूर येथे गेलेल्या भिवापूर येथील तरुणांच्या स्कॉर्पिओला परतीच्या प्रवासात अपघात झाल्याने यात चालक ठार तर त्याचे तीन सहकारी मित्र गंभीर जखमी झाले. सदर अपघात भिवापूर लगतच्या भुयार परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास झाला. मोहित उमराव गिरी (२१) रा. भिवापूर असे मृताचे नाव आहे. तर सुनील विठ्ठल मैदिले (४५) रा. भिवापूर, अमर गुलाब कांबळी (२३), आदेश सिद्धार्थ गायकवाड (२९) दोन्ही रा. तास, अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार मृत व जखमींसह त्यांचे शहरातीलच अन्य तीन मित्र असे एकूण सात जण मंगळवारी दुपारच्या सुमारास स्कॉर्पिओ क्र. एम.एच. २३ ई. ९६४१ या वाहनाने चिमूर येथे गेले होते. रात्री परत येत असताना भुयार मार्गावरील सेव्हन हिल्स रेस्टॉरंटजवळ चालक मोहितचे भरधाव स्कॉर्पिओवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. स्कॉर्पिओ तब्बल दोनवेळा पलटी झाल्याने चालक मोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात तीन सहकारी गंभीर जखमी झाले असून, अन्य तीन सहकारी सुखरूप आहेत. अपघातस्थळ भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलिसांच्या हद्दीत येत असले तरी भिवापूरपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मृत व जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर तिन्ही गंभीर जखमींना नागपूर येथे हलविण्यात आले. यावेळी रुग्णालयात आप्तस्वकीयांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पवनी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला आहे.