लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलचे आयोजननागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार व रविवार, २१ व २२ नोव्हेंबर रोजी लोकमत भवन, बी विंग मधील अकराव्या माळ्यावर सकाळी १० ते सायंकाळी ४.३० च्या दरम्यान होईल. सद्य:स्थितीत शिक्षणतज्ज्ञ विज्ञानाची विविध माहिती देण्यासाठी मॉडेल व प्रत्यक्ष प्रयोगाला आवश्यक मानत आहेत. विज्ञान फक्त पुस्तकांद्वारेच समजू शकत नाही, तर यासाठी व्यवहारिक मार्गदर्शनदेखील आवश्यक आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार वेगवेगळ्या श्रेणीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यात विद्यार्थ्यांना लिटमस टेस्ट, कार्बन डायआॅक्साइड फॉरमेशन, मेडबर्ग हेमिस्फेयर, रबर पॉवर बोट, बॅलेसिंग डॉल, बॅलेसिंग चॅलेंज, मॅगनेट्स अॅण्ड इट्स स्ट्रेंथ, डिफ्लेशन आॅफ निडल, मॅजिक पेन्सिल, रिवॉल्विंग अॅपल आदींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाईल. सोबतच या प्रात्यक्षिकांमागील सिद्धांतही समजून घेतले जातील. रविवारी दुसऱ्या दिवशी ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यात इमेज फॉरमेशन यूजिंग लेन्स, मॅग्निफिकेशन आॅफ लेन्स, ह्यूमन आय मॉडल, वर्र्किं ग आॅफ फिल्म प्रोजेक्टर, फूड टेस्ट फॉर फॅट अॅण्ड प्रोटीन, इमिसिबल लिक्विड्स, मॅच इट राइट बोर्ड गेम, चेंजिंग स्पीड आॅफ रोटेशन, मेक ए रोप-वे मॉडेल आदींचा समावेश असेल. काार्यशाळेत भाग घेण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लब सदस्यांसाठी ७०० रुपये व इतरांसाठी ८०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. नोंदणीसाठी प्रत्यक्ष लोकमत कॅम्पस क्लब कार्यालय, लोकमत भवन रामदासपेठ येथे संपर्क करावा. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेत जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी मो. क्रमांक ९८२२४०६५६२, ९९२२९६८५२६ वर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधता येईल.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा आज व उद्या
By admin | Updated: November 21, 2015 03:19 IST