शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुट्यात सुरू ठेवा शाळा; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:47 IST

: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता उन्हाळ्यातही वर्ग घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे किमान अध्ययन क्षमतेत असलेल्यांना द्या मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता उन्हाळ्यातही वर्ग घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. किमान अध्ययन क्षमतेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना यातून पूरक मार्गदर्शन करण्यासंदर्भात सर्व गटशिक्षण अधिकाºयांना सूचना केल्या आहेत.विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात असरच्या धर्तीवर सीआरजी ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत विद्यार्थ्यांची वर्गानुरूप किमान अध्ययन क्षमता लक्षात आली आहे. चाचणीच्या अहवालावरून सर्व तालुक्यांचा डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.त्यानुसार कोणते विद्यार्थी, कोणत्या प्रकारात किमान अध्ययनक्षमता प्राप्त करू शकले नाही, याची माहिती शाळेला देण्यात आली आहे. नवीन सत्र सुरू होणाºयापूर्वी जे विद्यार्थी मागे आहेत, अशा विद्यार्थ्यांना वर्गानुरुप क्षमता प्राप्त करून द्यायची आहे. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पूरक मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवालही मागविण्यात आला आहे.

सीईओंच्या शाळेला भेटीजि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शाळांना अकस्मात भेट देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेण्याचे आवाहन शिक्षकांना केले. यादव यांनी रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना भेटी दिल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळांमध्ये एकही विद्यार्थी यादव यांना दिसला नाही. हजेरीपटावर मात्र विद्यार्थी उपस्थित होते. यावर सीईओंनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र