शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅनचालकाकडून शाळकरी मुलीचा छळ

By admin | Updated: November 5, 2016 03:07 IST

स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीचा (वय १४) गेल्या दोन महिन्यांपासून छळ चालवला.

अजनीतील संतापजनक प्रकार उघड : गुन्हा दाखल, आरोपी गजाआडनागपूर : स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीचा (वय १४) गेल्या दोन महिन्यांपासून छळ चालवला. आरोपीने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी मुकाट्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करीत होती. हा गैरप्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्यानंतर अजनीत संतापाचे वातावरण निर्माण झाले. नंतर अजनी पोलिसांनी आरोपी व्हॅनचालक मनोज माणिक खांडेकर (वय ४५) याला अटक केली. आरोपी मनोज विवाहित असून त्याला पीडित मुलीच्या वयाची मुले आहेत. पीडित मुलगी त्याच्या घराशेजारी राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. आरोपीच्या व्हॅनमधूनच ती शाळेत जायची. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी ती एकदा व्हॅनमध्ये एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा हात पकडला.नंतर तो संधी मिळताच तिला स्पर्श करू लागला. मुलीने विरोध केला असता त्याने ‘आपले अनेक खतरनाक गुन्हेगारांशी संबंध आहे, या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन ’, अशी धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी हादरली. तर, आरोपी निर्ढावला. त्याने तिला संपर्कात ठेवण्यासाठी तीन-चार वेळा तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने बॅलेन्स रिचार्ज करून दिला होता. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अजनीचे ठाणेदार सांदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस. यू. मंडवाले यांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी व्हॅनचालक मनोज खांडेकर याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.ती अभ्यासातही मागे पडलीतो उठसूठ कधीही तिच्याशी संपर्क करू लागला. वाईट मेसेज निर्लज्जपणे पाठवू लागला. त्यामुळे मुलगी भेदरली. त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला. चांगली हुशार मुलगी सराव परीक्षेत मागे पडल्याचे अन् ती प्रत्येकवेळी अस्वस्थ राहत असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यामुळे आईने तिचा मोबाईल चेक केला असता त्यात आरोपी व्हॅनचालक मनोजचे निर्लज्ज मेसेज आईला दिसले. संतापलेल्या आईने गुरुवारी मुलीला खोदून खोदून विचारले तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. आईने मुलीच्या वडिलांना हा गैरप्रकार सांगितला.