शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 03:28 IST

गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले,

शारीरिक अन् मानसिक वेदना : तिने करून घेतली सुटकानागपूर : गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले, काय वाईट त्याची जाण नसली तरी आपल्यामुळे आप्तांना होत असलेला त्रास त्यांना जाणवतो. त्यातून अस्वस्थ झालेली काही अल्पवयीन मुलं आत्मघातकी निर्णय घेतात. असाच निर्णय घेत रागिणी बबन बोरकर (वय १३) या शाळकरी मुलीने शनिवारी सकाळी गळफास लावला अन् स्वत:ची शारीरिक व मानसिक त्रासातून सुटका करून घेतली. तिच्या आत्महत्येनंतर चर्चेला आलेल्या परिस्थितीमुळे मानकापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मानकापूर हद्दीत पिटेसूर खाण वस्ती आहे. येथे बबन बोरकर (वय ३५) राहतो. तो खाणीवर चालणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर होता. काम बंद झाल्याने सध्या तो मिळेल ते काम करतो. त्याची पत्नी धनश्री मोलमजुरी करते. त्यांना रागिणी आणि अन्य दोन मुले आहेत. दिवसभर कमवायचे आणि रात्रीची सांज भागवायची, अशी या कुटंबाची स्थिती आहे. त्यांच्या झोपडीला धड दारही नाही. तेथे बाकी गोष्टीची काय सोय असेल याची कल्पना केलेलीच बरी. बबनची मोठी मुलगी रागिणी आठव्या वर्गात शिकत होती. तिला काही तासांपासून डोक्याच्या त्रासाचा आजार जडला. परिस्थिती नसूनही बबन आणि त्याची पत्नी रागिणीला दवाखान्यात नेत होते. मात्र, आराम पडत नव्हता. रागिणीला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत होत्या. घरी दोन दोन दिवस खायची सोय नसताना डोकेदुखीच्या वेदना, त्यात स्वत:सोबतच आईवडिलांची होणारी परवड तिला कमालीचा मानसिक त्रास देत होती. स्वत:चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नव्हता अशात आपल्या आजारामुळे आईवडिलातील विसंवादाने ती अस्वस्थ झाली आणि शनिवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत तिने चिंध्यांची दोरी बनवून गळफास लावून आत्महत्या केली. शेजारची महिला झोपडीसमोरून जात असताना तिला रागिणी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरड केली. शेजारी गोळा झाले. बबन आणि धनश्रीलाही शेजाऱ्यांनी शोधून आणले.(प्रतिनिधी) गरीब शेजाऱ्यांची धावपळदारिद्र्याचे चटके अन् पोटाची आग यामुळे मेटाकुटीला आलेली बबन बोरकरची दोन मुले आठ दिवसांपासून नाशिकला मामांकडे गेली. ती तेथेच आहे. इकडे रागिणीने स्वत:ची अशा प्रकारे सुटका करून घेतली. गोळा झालेल्या शेजाऱ्यांनी धावपळ करीत रागिणीच्या अंत्यसंस्काराची तयारी करतानाच बोरकर दाम्पत्यालाही सावरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रशासन आणि समाज आता या कुटुंबाची कशी मदत करतो, त्याकडे पिटेसूर वस्तीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.