नागपूर : करंट लागलेल्या भावाला वाचविण्यासाठी धावलेल्या शाळकरी बालकाचा करुण अंत झाला. रितिक मानसिंग पाल (वय ११) असे मृताचे नाव आहे तर, त्याचा भाऊ निखिल हा गंभीर अवस्थेत मेयोत दाखल आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेने जरीपटक्यातील कस्तुरबानगरात तीव्र शोककळा पसरली आहे. कस्तुरबानगरातील एनआयटी क्वॉर्टरमध्ये मानसिंग पालचे कुटुंबीय राहतात. मानसिंग पाणीपुरी विक्रेता आहे. त्याचा मुलगा निखिल सहावीचा विद्यार्थी आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास आंघोळ केल्यानंतर निखिल त्याच्या घराच्या अँगलला बांधलेल्या तारावर कपडे वाळू टाकत होता. त्याला जोरदार करंट लागल्यामुळे तो ओरडला. निखिलला करंट लागल्याचे लक्षात येताच लहान भाऊ रितिक त्याला वाचविण्यासाठी धावला.
करंटमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू
By admin | Updated: April 12, 2016 05:19 IST