शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

क्यूआर कोड स्कॅन करणे महागात पडले; ऑनलाईन फ्रीज विक्रीतून १० लाख रुपयांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 20:51 IST

Nagpur News जुना फ्रीज विकत घेणाऱ्या खरेदीदाराने क्यू आर कोड पाठवला व तो स्कॅन करायला लावला. त्या आधारे महिलेच्या खात्यातून तब्बल १० लाखांची रक्कम लांबवली.

ठळक मुद्देसावनेर शहरातील प्रकार

नागपूर : अलीकडे ऑनलाइन खरेदी-विक्रीसाेबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहे. सावनेर शहरातील महिलेचे घरातील जुना फ्रीज विकण्यासाठी ऑनलाइन पाेस्ट टाकली. त्या फ्रीजला खरेदीदार मिळाल्याने साैदाही ठरला. मात्र, खरेदीदाराने पैसे देण्याच्या निमित्ताने फ्रीज विक्रेता महिलेला विश्वासात घेत, क्यूआर कोड पाठवून ताे स्कॅन करायला लावला. त्या आधारे खरेदीदाराने विक्रेता महिलेच्या खात्यातून तब्बल १० लाख २६ हजार रुपयांची परस्पर उचल करीत तिची फसवणूक केली. हा प्रकार साेमवारी (दि.२९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.

रिना राजाराम गोसाई, रा.माैनीबाबा राेड, गुजरखेडी, सावनेर यांना त्यांच्या घरातील जुना फ्रीज विकायला असल्याने, त्यांनी ‘ओएलएक्स’ या ॲपवर फ्रीज विकण्याबाबतची माहिती अपलाेड केली. राजेश कुमार नावाच्या व्यक्तीने ताे फ्रिज ४,५०० रुपयांत विकत घेण्याची ऑनलाइन इच्छा व्यक्त केली. त्याला रिना गाेसाई यांनी हाेकार दर्शविला. पुढे राजेश कुमार याने माेबाइल फाेनवर संपर्क केला व फ्रीजचे पेमेंट ऑनलाइन करीत असून, मुलाला फ्रीज घेण्यासाठी पाठविताे आहे, अशी रिना गाेसाई यांना बतावणी केली.

रक्कम ट्रान्सफर हाेत नसल्याचे सांगून राजेश कुमार याने रिना गाेसाई यांना त्यांच्या माेबाइल फाेनवर स्कॅन काेड पाेस्ट करून क्यूआर कोड स्कॅन करायला लावला. क्यूआर कोड स्कॅन करताच, राजेश कुमार याने रिना गाेसाई यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या सावनेर शाखेतील खात्यातून १० लाख २६ हजार रुपयांची उचल केली. ही बाब लक्षात येताच, रिना गाेसाई यांनी पाेलिसात धाव घेतली. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

अशी केली रकमेची उचल

राजेश कुमार याने रिना गाेसाई यांना स्कॅन कोड पाठवून आधी त्यांच्या खात्यात दोन रुपये आणि नंतर दोन रुपये असे एकूण चार रुपये जमा केले. त्यानंतर, त्याने ४,४९८ रुपये खात्यात ट्रान्सफर हाेत नसल्याचे रिना गाेसाई यांना सांगून ती रक्कम मशीनद्वारे खात्यात जमा करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने रिना गाेसाई यांना क्यूआर काेड स्कॅन करायला लावला. रिना गाेसाई यांनी हा काेड स्कॅन करताच, त्यांच्या बचत खात्यातील २२,५६१ रुपये आणि एफडी खात्यातील ९ लाख ८० हजार ६३० रुपये असे एकूण १० लाख २६ रुपयांची परस्पर उचल केली. 

अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्षऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी बँक व पाेलीस अधिकारी खातेदारांना वारंवार सूचना देत, बँक खाते, एटीएम व क्रेडिट कार्ड क्रमांक, त्यांचे पिन नंबर, तसेच बँक खात्याबाबतची काेणतीही गाेपनीय माहिती कुणालाही देऊ अथवा सांगू नका. बँक अधिकारी ही माहिती कधीही फाेनवर विचारत नाहीत. माेबाइल फाेनवर प्राप्त हाेणाऱ्या संशयास्पद लिंक क्लिक करू नका, यासह अन्य बाबींबाबत वारंवार आवाहन करीत असते. मात्र, नागरिक या बाबी गांभीर्याने घेत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम