शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी स्कॅनिया उत्सुक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:17 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही.

ठळक मुद्देनवीन आॅपरेटरचा शोध : स्कॅनियाने बंगळुरू येथीय युनिट गुंडाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही. अशा परिस्थितीत ग्रीन बस सुरू होण्याची शक्यता नाही.स्कॅनियाने बंगळुरू येथे ग्रीन बस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प कंपनीने बंद केला आहे. स्कॅनिया कंपनीचा मुख्य व्यवसाय बस निर्मितीचा आहे. ही कंपनी बस संचालन करीत नाही. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव स्वीडनच्या अ‍ॅबेसी, स्कॅनियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस संचालनाला होकार दिला होता. परंतु बंगळुरू येथील उत्पादन बंद करण्यात आल्याने ग्रीन बस सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्कॅनिया कंपनी रेड बस आॅपरेटर ट्रॅव्हल्स टाइम पुणे ही कंपनी नागपुरातील ग्रीन बसचे संचालन करते. ठाणे शहरातही या कंपनीमार्फ त ग्रीन बस चालविली जाते. ही कंपनी नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी इच्छूक आहे. परंतु स्कॅनिया कंपनीच्या सहमतीशिवाय ते शक्य नाही.सुत्रांच्या माहितीनुसार १८ आॅगस्ट २०१७ ला महापालिके ने स्कॅनिया कंपनीसोबत ग्रीन बस संचालनाचा १५ वर्षासाठी करार केला होता. स्कॅनियाने इस्त्रो खाते, जीएसटी सोबत थकीत रक्कम व सुसज्ज बस डेपोची सुविधा उपलब्ध न केल्याने महापालिके ला नोटीस बजावून ग्रीन बस सेवा बंद केली. त्यामुळे महापालिकेला कोणतीही कारवाई करता येत नाही. करारानुसार स्कॅनियाला वाटले तर त्रयस्त भागीदाराची नियुक्ती करून शहरात ग्रीन बस सुरू करू शकते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आॅपरेटरच्या माध्यमातून शहरात ग्रीन बस चालविण्याच्या तयारीत आहेत. आता यात परिवहन विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत परिवहन विभागाची प्रतिमा फारशी चांगली नाही. परिवहन समितीने परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी केली आहे.१०.५० कोटींची थकबाकीमहापालिकेवर स्कॅनिया कंपनीची १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. यात प्रवासी भाड्याचे ७.५० कोटी, कराराच्यावेळी कंपनीने जमा के लेली अग्रीम रक्कम परत मागितली आहे. या संदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. ही थकबाकी स्कॅनिया कंपनीला परत करण्याची तयारी ट्रॅव्हल टाइमने दर्शविली आहे. यातून महापालिकेवरील थकबाकी कमी होईल. या मोबदल्यात ट्रॅव्हल टाइमने रेड बससाठी इस्त्रो खाते उघडण्याची मागणी केली आहे. या खात्यासाठी ९ कोटींची रक्कम लागणार आहे. परंतु ही अट महापालिकेला मंजूर नाही.‘एजेंट ’ची भूमिका महत्त्वाचीग्रीन बस इथेनॉलवर चालविली जाते. परंतु स्कॅनिया कंपनीतर्फे तयार करण्यात येणारे ‘एजेंट ’मिसळवल्यानंतरच बस चालते. संबंधित एजेंटचा फॉर्म्युला कंपनीने गुप्त ठेवला आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत या कंपनीकडून होकार मिळत नाही. तोपर्यंत दुसरा आॅपरेटर ग्रीन बसचे संचालन करू शकत नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक