शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए-अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला आहे. नागपूर ...

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला आहे. नागपूर विभागातील काही एमबीए व अभियांत्रिकी महाविद्यालयांत बोगस कागदपत्रांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही बाब समोर आली आहे. त्यामुळे विभागातील महाविद्यालयांत झालेल्या प्रत्येक प्रवेशाची बारकाईने तपासणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागात एमबीएत १६ बोगस प्रवेश झाले होते. प्रवेश प्रक्रियेनंतर ऑथॉरिटीतर्फे विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सर्वच अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यादरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमातदेखील बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची प्रकरणे समोर आली. २०२०-२१ मधील एकाही प्रवेशाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या प्रवेशांना ऑथॉरिटीची मान्यता मिळणार नाही. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर काहीच परिणाम होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट असल्याचे समोर येईल, त्या महाविद्यालयांना त्याची माहिती देण्यात येईल. यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यासंबंधात काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

असा झाला घोटाळा

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झाली होती. कागदपत्रेदेखील ऑनलाइनच दाखल करण्यात आली होती. एआरसी केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्याचा फायदा उचलत काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर प्रवेश केले.