शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सत्य कथन करणे जोखिमीचे

By admin | Updated: August 10, 2014 01:29 IST

सत्य कथन करणे अलीकडच्या काळात जोखिमीची बाब झाली आहे. पण सत्य सांगितलेच पाहिजे, असे मत जनता दल (यु.)चे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी व्यक्त केले.

शरद यादव : राजेंद्र माथूर स्मृती व्याख्याननागपूर : सत्य कथन करणे अलीकडच्या काळात जोखिमीची बाब झाली आहे. पण सत्य सांगितलेच पाहिजे, असे मत जनता दल (यु.)चे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा व दैनिक भास्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजेंद्र माथूर स्मृती व्याखानमालेत ते ‘सच, दो टूक सच’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. गिरीश गांधी व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे होते.यादव यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यात झालेल्या बदलाकडे लक्ष वेधले. दैववादावर टीका करीत समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी सत्याला देव मानत. पण ते देवाच्या शोधात कधीच फिरले नाही तर त्यांनी सर्वसामान्य माणसात देव शोधला. त्याचे दु:ख निवारण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. आता सर्वच क्षेत्रात चित्र बदलले आहे. आता सत्याची परिभाषाच बदलली. प्रत्येक जण सत्याकडे त्यांच्या नजरेने पाहतो. यात समाजाचा दोष नाही. समाजाला दिशा देणारे नेतृत्व नाही. त्यामुळे सत्य सांगणे कठीण झाले आहे. पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही. समाजात काही चांगलेही लोक आहेत व त्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहेत, त्यांना शक्ती देण्याची गरज आहे, असे यादव म्हणाले.देशाने प्रगती केली, असा दावा केला जात असला तरी सत्य वेगळे आहे. आजही विविध क्षेत्रात विदेशी वस्तूंचेच प्राबल्य आहे. विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने भारतालाही विदेशातील बाजारपेठेवर वर्चस्व स्थापन करण्याची संधी मिळेल,असे सांगण्यात येत असले तरी देशांतर्गत नैसर्गिक साधनसामग्री नष्ट करण्याकडेच सध्या कल आहे. जोपर्यंत देशातील नागरिक सक्षम होणार नाही तोपर्यंत भारत विश्वशक्ती होणार नाही,असे यादव म्हणाले. भारताला सुपर पॉवर करण्याची भाषा एकीकडे केली जात असताना दुसरीकडे समाज आजही दैववाद, जातपात आणि धर्मात अडकला आहे. विषमता आहे. यातून समाजाची सुटका करणे गरजेचे आहे. नवनवीन संशोधन करणे गरजेचे आहे, असे यादव म्हणाले.यावेळी दत्ता मेघे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद शर्मा यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश दुबे यांनी केले. (प्रतिनिधी)एनडीए, युपीएचे धोरण सारखेचसत्तेतून पायउतार झालेली युपीए आणि सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचे आर्थिक धोरण सारखेच आहेत. युपीएनेही विदेशी गुंतवणुकीचा पुरस्कार केला होता. एनडीएही तेच करीत आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी अर्थमंत्री चिदंबरम आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात या बाबीत साम्य आहे, असे शरद यादव म्हणाले. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातूनच ब्रिटिश भारतात आले व त्यांनी देशावर राज्य केले. स्वातंत्र्यानंतरही आता विदेशी कंपन्यांसाठी भारताने दारे मोकळी केली आहेत, अशी टीका यादव यांनी केली.