शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर-कळमेश्वर नवीन राष्ट्रीय महामार्ग

By admin | Updated: October 10, 2015 02:57 IST

सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. ५४७-ई असा क्रमांक असलेल्या या महामार्गाचा ...

हायकोर्टात माहिती : केंद्र शासन करणार बांधकामनागपूर : सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. ५४७-ई असा क्रमांक असलेल्या या महामार्गाचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विकास करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.सावनेर रिंग रोडवरील २.५ किलोमीटरचा विकास रखडल्यामुळे समाजसेवक पन्नालाल गुराडीकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात केंद्र शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सावनेर रिंग रोडवरील २.५ किलोमीटरच्या खराब रोडचा सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या राष्ट्रीय महामार्गातच समावेश होणार असल्याचे केंद्र शासनाचे वकील अनीश कठाणे यांनी सांगितले. सावनेर रिंग रोडसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादित केली होती. यानंतर आठ किलोमीटरचा पट्टा केंद्र शासनाने स्वत:च्या ताब्यात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत विकास केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील २.५ किलोमीटरचा रोड नादुरुस्त आहे. या रोडच्या विकासाची जबाबदारी प्राधिकरणवर नाही असेही कठाणे यांनी स्पष्ट केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रत्युत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देऊन सुनावणी तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)