शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. ...

नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कॉटन मार्केट येथील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रमेश पाटील, विश्रांती झांबरे, मंगला पाटील, वंदना लांजेवार, सुधा वासनिक, राजश्री वासनिक, यशोधरा नानवटे, सी.टी. बोरकर, एस.टी. पााझारे, पंजाबराव मेश्राम आदी उपस्थित होते.

---------

हरदास शैक्षणिक व सांंस्कृतिक संस्था ()

हरदास शैक्षणिक व सांंस्कृतिक संस्थेतर्फे हरदास महाविद्यालय कामठी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, खैरे सर, दादासाहेब कुंभारे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गजभिये प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी शिक्षिका विशाखा पाटील व गंगा मेहरोलिया यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

---------------

ऑल इंडिया दलित महिला अधिकार मंच

संबुद्ध महिला संघटनेेच्या सहकार्याने ऑल इंडिया दलित महिला अधिकार मंचतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध भागामध्ये जयंतीचा कार्यक्रम आयोजित करून सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्याची माहिती, महिलांचे प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण, शेतकऱ्यांचे आंदोलन यावर प्रकाश टाकण्यात येईल. याअंतर्गत रविवारी सुगत बुद्धविहार, अंबाझरी टेकडी येथे जयंतीचा कार्यक्रम पार पडला. ४ तारखेला इंदोरा बाराखोली, ५ तारखेला कोराडी, ६ तारखेला अंबाझरी, ७ तारखेला पांढराबोडी, ८ ला गोधनी, ९ ला सुदामनगरी येथे ऑल इंडिया दलित महिला अधिकार मंचच्या राष्ट्रीय कन्वेनर डॉ. विमल थोरात, छाया खोब्रागडे, सुगंधा खांडेकर, संजीवनी कुमरे या मार्गदर्शन करतील.

--------------

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.