शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा १.६० कोटींचा खर्च वाचला

By admin | Updated: October 17, 2016 02:50 IST

नागपूर महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीव्दारे करण्यात दोन वर्षानंतर यश आले आहे.

शालार्थ प्रणालीमुळे दिलासा : शिक्षकांचे आॅनलाईन वेतननागपूर : नागपूर महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीव्दारे करण्यात दोन वर्षानंतर यश आले आहे. यामुळे दर महिन्याला वेतनावर करावा लागणारा १ कोटी ६० लाखांचा खर्च वाचणार असल्याने महापालिकेला बिकट आर्थिक परिस्थितीत थोडा दिलासा मिळाला आहे. दर महिन्याला शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु शालार्थ प्रणालीमुळे सप्टेंबर महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचा लाभ २५८ शिक्षक व ६३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शालार्थ प्रणाली लागू न केल्याने माध्यमिक शिक्षकांचे वेतन महापालिकेला करावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१५ पासून या शिक्षकांच्या वेतनावर ३० कोटी ४० लाखांचा खर्च करावा लागला आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन एप्रिल २०१४ पासून आॅनलाईन झाले आहे. परंतु महापालिके च्या शाळांचे वेतन आॅनलाईन न झाल्याने वेतनचा भुर्दड महापालिकेवर पडत होता.(प्रतिनिधी)३० कोटी लवकरच मिळतीलमहापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन आॅनलाईन व्हावे. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. शिक्षण समितीच्या प्रत्येक बैठकीत याचा आढावा घेण्यात येत होता. अखेय या प्रयत्नांना यश मिळाले. या निर्णयामुळे शिक्षकांना दर महिन्याला वेळेवर वेतन मिळेल. महापालिकेच्या खर्चात बचत होईल. महापालिकेते खर्च केलेला ३० कोटी ४० लाखांचा निधी शासनाकडून लवकरच मिळेल.-गोपाल बोहरे,शिक्षण सभापती