शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जेईईमध्ये सौरभ विदर्भात टॉपर

By admin | Updated: June 13, 2016 03:07 IST

देशातील आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी घोषित करण्यात आला.

१८० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्रनागपूर : देशातील आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १८३ वी रँक घेणारा नागपूरचा सौरभ टोटे विदर्भात टॉपर ठरला. सौरभ हा डॉ.आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे. ओबीसीमधून सौरभची २० वी रँक आली आहे. अखिल भारतीय स्तरावर २१६ वी रँक घेणारा पीयूष राठी दुसऱ्या स्थानी तर २५१ वी रँक घेणारा सौरव रे तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात घेण्यात आलेली जेईई-अ‍ॅडव्हान्समध्ये विदर्भातून २००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या वर्षी परीक्षेचे आयोजन आयआयटी गुवाहाटीने केले होते. दरम्यान संकेतस्थळ जाम झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहताच आला नाही. तज्ज्ञाच्या मते, या वर्षी विदर्भाचा निकाल निराशाजनक लागला. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातून केवळ १८० विद्यार्थ्यांना यात यश मिळाले. बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षानुसार रँक मिळाली नाही. टॉप ५०० मध्ये फार कमी विद्यार्थी आल्याची माहिती आहे. निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांसोबतच कॉलेज आणि शिकवणी वर्गाने निकाल पाहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु निकाल पाहण्यासाठी त्यांना तासन्तास वाट पहावी लागली. एका विद्यार्थ्याने सांगितले की, सकाळपासूनच वेबसाईट (संकेतस्थळ) संथ गतीने चालत होते.(प्रतिनिधी)