शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीचे सत्यशोधक ताराचंद्र खांडेकर

By admin | Updated: August 28, 2014 02:03 IST

जीवनभर आंबेडकरी निष्ठा व बाण्याने जगलेले, तारांचद्र खांडेकर हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे संदर्भपुरुष आहेत. त्यांचे संदर्भ वाचून, आत्मसात करून चळवळीतील अनेक नेते मोठे झाले.

अमृत महोत्सवर्षी अभीष्टचिंतन सोहळा : वक्त्यांचे गौरवोद्गार नागपूर : जीवनभर आंबेडकरी निष्ठा व बाण्याने जगलेले, तारांचद्र खांडेकर हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे संदर्भपुरुष आहेत. त्यांचे संदर्भ वाचून, आत्मसात करून चळवळीतील अनेक नेते मोठे झाले. इतरांवर वैचारिक कुरघोडी करण्याचे बळ कार्यकर्त्यांना मिळाले. आंबेडकरी चळवळीचे ते खऱ्या अर्थाने सत्यशोधक आहेत, असे प्रतिपादन लाँगमार्चचे प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झांशी राणी चौकातील मोरभवन येथील मधुरम सभागृहात त्यांचा अभीष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी ताराचंद्र खांडेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. चळवळीची निर्भीडता प्रखरतेने, बिनधास्तपणे मांडून त्यांनी आंबेडकरी विचारांची कास आजतागायत कायम ठेवली आहे. माणूस पैशाने श्रीमंत होतो, मनाने श्रीमंत असणारी माणसे शोधण्यासाठी पावले पदोपदी झिजवावी लागतात. एकत्र आलेला समाज विचार करतो आणि जो समाजक्रांती करतो त्याचा विजय होतो. खांडेकरांनी अशाच समाजाचा विचार जपला, असे मत प्रा. कवाडे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोणत्याही प्रगतीची वाट ही कुटुंबापुरती मर्यादित नसते. त्याचा समाजाशी संबंध असतो. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याची ताकद असामान्य व्यक्तीमध्येच असते. खांडेकर यांचे व्यक्तिमत्त्वसुद्धा असेच असल्याने त्यांच्या कर्तृत्वगुणांचा हा सोहळा आहे. आंबेडकरी चळवळीशी कायम एकनिष्ठता जपून सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा धागा जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाईल. भदंत विमलकीर्ती गुणसिरी म्हणाले, बुद्धिमान समाज म्हणून विचारवंतांवर महत्त्वाची जबाबदारी असते. तेव्हा साहित्याची चळवळ थांबू नये, ही अपेक्षा आहे. अनुसूचित जाती व जनजाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी खांडेकरांच्या वैचारिक व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकला. मेडिकलचे कर्करोग विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, अनेकजण जगतात. केवळ चालतात. डोक्याने विचार करीत नाही. जो विचार करतो त्याचेच अभीष्टचिंतन होते. खांडेकरांनी विचारांशी तडजोड केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर खांडेकर यांच्या पत्नी अस्मिता खांडेकर, मारोतराव कांबळे उपस्थित होते. बबन चहांदे यांनी खांडेकर यांचा परिचय करून दिला. इ.मो. नारनवरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीरजबोधी यांनी संचालन केले. डॉ. सुचित बागडे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे, भीमराव वैद्य, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मालती बोदोले, प्रा. तुळसा डोंगरे, नरेश वाहाणे, प्रवीण मानवटकर, का.रा. वालदेकर, अ‍ॅड. रमेश शंभरकर, विजय चिकाटे, डॉ. अनिल हिरेखण, बंटी उके, प्रकाश बन्सोड, बबन बोंदाटे, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. एन.डी. पाटील, डॉ. सुहास कानफाडे यांच्यासह समाजातील नागरिक व चळवळीतील कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)