शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सात्विक चारित्र्यच राष्ट्रनिर्माणाच्या कामी येते

By admin | Updated: December 26, 2016 02:43 IST

रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम फक्त शिक्षण देणे नसून युवा पिढीमध्ये सात्विक चारित्र्य निर्माण करण्याचेही आहे.

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ नागपूर : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम फक्त शिक्षण देणे नसून युवा पिढीमध्ये सात्विक चारित्र्य निर्माण करण्याचेही आहे. सात्विक चारित्र्यच विषयनिष्ठ शिक्षणाला राष्ट्रनिर्माणाच्याप्रति सक्रिय करू शकते, असे सांगत विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याच्या वाटेवर चालावे, असे आवाहन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभात शनिवारी थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते. रामदेवबाबा महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्यानंतर ३०४८ पदवीधर पदवी घेऊ बाहेर पडले. यापैकी ११०० पदवीधारकांना पालक, शिक्षक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आसामच्या तेजपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मिहीर चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण नुवाल, अ‍ॅड. चंद्रकांत ठाकर, गोविंदलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ. रासु पांडे, डॉ. डी.के. अग्रवाल, तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे, डॉ. एन.के. चौधरी उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदवीधारकांना सत्यमवद, धर्मचर, स्वाध्ययन, असा वैदिक काळापासून चालत आलेला परिपाठ समजावून सांगितला. जागतिकीकरणात स्पर्धा वाढली असून देशाची मान आपल्या कृतीने उंचावण्याचे आवाहन त्यांनी पदवीधारकांना केले. प्रो. मिहीर के. चौधरी यांनी आपल्या भाषणात स्नातकांना त्याची जबाबदारी समजून राष्ट्रहितासाठी झटण्याचे तसेच भारताला जागतिक अर्थकारणात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. परीक्षा नियंत्रक डॉ. अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधारकांनी शपथ ग्रहण केली. प्राचार्य डॉ. रा. सु. पांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. आकांक्षा देशपांडे व प्रा. प्रतिऋति सिंग अग्रवाल यांनी संचालन केले.(प्रतिनिधी) रामदेवबाबा पदक जाहीर यावेळी रामदेवबाबा पदक प्रथमच जाहीर करण्यात आले. २०१५ साठी हा सन्मान पूजा संजय पलोड हिला जाहीर करण्यात आला तर २०१६ साठी अनुज किशोर फोले ही या पदकाची मानकरी ठरली.