शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उके हे देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी अर्जावर उत्तर सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत दाखल केलेल्या ...

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत दाखल केलेल्या मध्यस्थी अर्जावर याचिकाकर्ते अ‍ॅड. सतीश उके उत्तर सादर करणार आहेत. त्यांनी गुरुवारी याकरिता वेळ मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी २३ जूनपर्यंत तहकूब केली.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १२ जून २०१४ रोजी सोनेगाव परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सोनेगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या दबावामुळे त्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कायद्यानुसार तपास केला नाही, असा उके यांचा आरोप आहे. फडणवीस यांनी हा आराेप फेटाळून लावला आहे. ही याचिका वाईट हेतूने दाखल करण्यात आली असल्यामुळे आवश्यक बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी याचिकेत प्रतिवादी करून घेण्यात यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या विनंतीवर उके यांचे उत्तर आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. उके यांनी त्यांची बाजू स्वत: मांडली तर, फडणवीस यांच्यावतीने अ‍ॅड. अथर्व मनोहर यांनी कामकाज पाहिले.

--------

सरकारचे उत्तर आले नाही

न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी राज्य सरकारला नोटीस बजावून उके यांच्या याचिकेवर १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. परंतु, सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितली. त्यामुळे न्यायालयाने सरकारला पुढील तारखेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.