शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भूमिपूजनामुळे लाभणार पॅरामेडिकल केंद्राला संजीवनी!

By admin | Updated: August 10, 2016 02:33 IST

आरोग्यसेवेतील तंत्रज्ञांचा तुटवडा दूर करण्याच्या उद्देशाने देशात नऊ पॅरामेडिकल प्रादेशिक केंद्र उभारण्याचा निर्णय २०१२ मध्ये केंद्र शासनाने घेतला.

मेडिकल : चार वर्षांपासून प्रकल्प रखडलेला नागपूर : आरोग्यसेवेतील तंत्रज्ञांचा तुटवडा दूर करण्याच्या उद्देशाने देशात नऊ पॅरामेडिकल प्रादेशिक केंद्र उभारण्याचा निर्णय २०१२ मध्ये केंद्र शासनाने घेतला. यातील एक ८० कोटींचे केंद्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) होणार होते. मात्र चार वर्षे होऊनही प्रकल्प थंडबस्त्यात पडला आहे. केंद्राचे याकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रकल्पाला ‘संजीवनी’देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या सेवेइतकेच रु ग्णांच्या सुश्रुषेला महत्त्व आहे. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफला आरोग्य क्षेत्रातील कणा म्हटले जाते. देशभरात पुरेसे पॅरामेडिकल कर्मचारी निर्माण व्हावेत, या हेतूने देशातील विविध भागात प्रादेशिक केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला हे केंद्र औरंगाबाद शहरात उभारण्यात येणार होते. परंतु, जागेअभावी येथे हे केंद्र नाकारण्यात आले. यामुळे मध्य भारतामध्ये नागपूरच्या मेडिकलला हा मान मिळाला. मेडिकल प्रशासनाने टीबी वॉर्ड परिसरातील जागाही उपलब्ध करून दिली. ही जागा पाहण्यासाठी दीड वर्षांपूर्वी तत्कालीन ‘जनरल आॅफ हेल्थ सर्व्हिसेसच्या अतिरिक्त संचालक डॉ. मंगला कोहली आल्या होत्या. त्यांनी टीबी वॉर्ड परिसरात सात एकर जागेवर पॅरामेडिकल प्रादेशिक केंद्र उभारण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. गेल्या वर्षी केंद्राच्या प्रस्तावित जागेच्या पाहणीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या एका चमूने पाहणी करून नकाशा तयार केला. इमारतीच्या बांधकामासाठी एजन्सीची निवडही झाली. परंतु केंद्राकडूनच या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने पुढील विकास कामे थंडबस्त्यात पडली. याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पाचे भूमिपूजन करता येईल का, यासाठी मेडिकल प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन्ही नेते या कार्यक्रमाला हजर राहिल्यास पुढील दोन वर्षांत ‘पॅरामेडिकल’ केंद्र सेवेत असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)