शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर

By admin | Updated: March 5, 2017 01:51 IST

नागपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता अर्थात विरोधी पक्षनेतेपदी अडीच वर्षांसाठी संजय महाकाळकर यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे.

अडीच वर्षासाठी निवड : निरीक्षकांनी जाणून घेतली नगरसेवकांची मते नागपूर : नागपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता अर्थात विरोधी पक्षनेतेपदी अडीच वर्षांसाठी संजय महाकाळकर यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे. महाकाळकर हे प्रभाग ३० मधून निवडून आले असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण विचारात घेता गटनेत्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री आरीफ नसीम खान व विनायक देशमुख यांना नागपुरात पाठविले होते. त्यांनी रविभवन येथे सर्व २८ नगरसेवकांची मते जाणून घेतली. राजीनामा पाठविणाऱ्या गार्गी चोपरा आल्या नाहीत. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गटनेतेपदी कुणाची निवड करावी, तुमची कुणाच्या नावाला सहमती आहे. गटनेतेपदाची जबाबदारी कोण सक्षमपणे पार पाडू शकेल, अशा आशयाचे प्रश्न प्रत्येक नगरसेवकांना विचारण्यात आले. या आधारावर गटनेत्यांची निवड करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. गटनेतेपदासाठी माजी खा. विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांच्या गटाचे समजले जाणारे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तानाजी वनवे व संजय महाकाळकर तर माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटाचे व महापालिकेत चौथ्यांदा निवडून आलेले पाच तास चालली रस्सीखेच गटनेतेपदासंदर्भात सकाळी ११ पासून दुपारी ३ असे चार तास नगरसेवकांसोबत स्वतंत्र चर्चा केली. परंतु काँग्रेसमधील गटातटामुळे चांगलीच रस्सीखेच सुरू होती. एका नावावर सर्वांची सहमती होत नव्हती. त्यामुळे आरीफ खान व विनायक देशमुख यांनी प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे व संजय महाकाळकर यांच्याशी पुन्हा संयुक्त चर्चा केली. या चर्चेनंतर निरीक्षकांनी प्रदेश काँग्रेसकडे संमतीसाठी पाठविले. तासभरानंतर प्रदेश काँग्रेसची संमती आली व त्यानंतर शहर काँग्रेसतर्फे विभागीय आयुक्तांना संजय महाकाळकर यांच्या नावाचे पत्र सादर करण्यात आले.