शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित

By admin | Updated: August 26, 2014 01:02 IST

दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरील संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून

१५ टक्के रक्कम भरून भूखंड नावावर : छोटू भोयर यांचे मानले आभारनागपूर : दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरील संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबीयांच्या नावावर आता ही जागा होणार आहे. ही झोपडपट्टी नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासूनचा प्रस्ताव प्रलंबित होता. यासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. संजय गांधीनगर झोपडपट्टी अधिकृत करून येथे राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर येथील जमीन करण्यात यावी, यासाठी येथील कुटुंबे अनेक वर्षांपासून झटत होती. ही वस्ती अधिकृत नसल्याने येथील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा व विविध योजनेपासून वंचित राहावे लागत होते. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरसेवक सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात डॉ. छोटू भोयर यांना निवेदन दिले होते. वस्तीतील नागरिकांना स्थायी जागा देण्यासाठी भोयर यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला. नासुप्रच्या जुलैमध्ये झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत भोयर यांनी हा विषय मांडला होता. त्यानंतरही त्यांचा पाठपुरावा कायम होता. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. या वस्तीचे नियमितीकरण करून नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. नासुप्रतर्फे प्रथमच मूळ भूखंडधारकांना फक्त १५ टक्के रक्कम भरून भूखंड आपल्या नावावर करून घेता येणार आहे. यापूर्वी ही अट २५ ते ५० टक्के रकमेची होती. या निर्णयामुळे परिसरातील नागरिक आनंदी आहेत. शहरातील उर्वरित अनियमित वस्त्यांचे नियमांप्रमाणे नियमितीकरण करून नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. ही वस्ती अधिकृत झाल्याने परिसरातील नागरिकांनी डॉ. भोयर, नगरसेवक सुधाकर कोहळे, रमेश सिंगारे यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी राजू घडेकर, सुधाकर बंडारे, सुधाकर मातने, अमोल कारेमोरे, राजू धरमठोक, सुनंदा सावरकर, सुनीता गुरखे, आनंद लुटे, चंद्रमणी खैर, मुकेश माहुरले, राजू बोंदरे, प्रकाश कोरडे, मनीष भोयर, मधुकर मातने, महादेव धरमठोक, वच्छला येरमे, विमल राचलवार, पुष्पा बिसेन, राधिका राघुते, सीता अहिरवार, लीला जांभूळकर, गंगाबाई मोगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)