शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संघर्षच यात्रेतून नेते गायब

By admin | Updated: March 30, 2017 02:27 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली.

मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत अनुपस्थित नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली. मात्र, या यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे. बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून या यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी आमदार निवास येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीरिपा आदी पक्षांचे नेते एकत्र आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह उपनेते आ. विजय वडेट्टीवार, सुनील केदार, डी.पी. सावंत, वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, पीरिपांचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेते एका एसी बसमध्ये बसून चंद्रपूरसाठी रवाना झाले. मात्र, नागपुरातून रवाना होणाऱ्या या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी स्थानिक नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, एसी बसमधून गारेगार प्रवास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढल्या जाणाऱ्या संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांनी बडेजावपणा मिरवू नये, असे अशा सूचना असतानाही विरोधी पक्षाचे नेते मर्सिडीज बेन्झच्या आलिशान एसी बसने नागपुरातून चंद्रपूरसाठी रवाना झाले. नागपूर ते चंद्रपूर असा गारेगार प्रवास या नेत्यांनी अनुभवला. शेतात उन्हाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा एसी बसमधून प्रवास करणारे नेते कशा समजणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही हा विषय कुतूहलाचा ठरला. आलिशान बसच्या नावाकडे प्रसार माध्यमाचे लक्ष जाताच मर्सिडीज बेन्झ लिहिलेले नाव टेपने झाकण्यासाठी तेवढ्यात आकाराचे ‘संघर्षयात्रा’ असे स्टीकर तयार करून त्यावर चिटकविण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात आला, हे विशेष.