शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा पुन्हा राममंदिराचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:42 IST

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळ येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवत भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यावर परतली असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उचलला आहे. संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठीचेच काम असल्याचे सांगत जे काही होत आहे ते प्रभू रामच करवून घेत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देमंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठीचेच काम : मोहन भागवत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळ येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवत भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यावर परतली असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उचलला आहे. संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठीचेच काम असल्याचे सांगत जे काही होत आहे ते प्रभू रामच करवून घेत असल्याचे मत व्यक्त केले आहे.राजाबाक्षा मंदिरातील हनुमान जन्मोत्सवात निघणाऱ्या शोभायात्रेच्या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, हनुमान हे प्रभू रामाचे सेवक होते. ते नेहमी रामनामाचा जप करायचे. आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा घेत रामसेवेत लागले पाहिजे. रामसेवा ही राष्ट्रसेवा असल्याचे सांगत समाजाची सेवा ही देखील रामाचीच सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भागवत यांनी अयोध्येचा उल्लेख करणे टाळले. मात्र, त्यांचे संकेत अयोध्येतील राममंदिर निर्माणबाबत होते.भागवत म्हणाले, हनुमान बुद्धिमान, विवेकी व सामर्थ्यवान होते. संघटन व नेतृत्वकुशल होते. एवढे गुणसंपन्न असतानाही ते भगवान रामाचे सेवक बनून राहत होते. आपण सर्वांनी त्यांच्या सारखेच प्रभू रामाचे काम करायला हवे. चांगल्या गोष्टींचे समर्थन करून त्याला चालना देखील हे देखील प्रभू रामाचे काम करण्यासारखेच आहे. प्रभू रामाचे काम करताना यश, सन्मान व कीर्ती प्रभू चरणी समर्पित करायला हवी.मी हे केले, असे म्हणू नका ! प्रभूचे काम करताना असे म्हणू नका की हे मी केले आहे. तर देवाने ते माझ्याकडून करवून घेतले, असे म्हणा. असे केले तरच हनुमान जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल, असेही डॉ. भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRam Mandirराम मंदिर