शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

संघात इन्सेंटिव्ह मिळत नाहीत : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:10 IST

साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्तम बनण्याचा प्रयत्न करते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पसर््िास्टंट सिस्टीम्स लि. च्या सौजन्याने श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन नागपूर निर्मित ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी कवि कुलगुरू कालिदास सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्यासह पर्सिस्टंटचे एचआर हेड समीर बेंद्रे, महानगर संघ चालक राजेश लोया, नाटकाचे लेखक अविनाश घांगरेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, आम्ही संघाचे अभिन्न अंग आहोत. राष्ट्र आराधना हा शब्द बुद्धीतून नाही तर हृदयातून आलेला आहे. मी क्रांतीतून असे म्हणणार नाही. कारण क्रांती ही काही प्रमाणात थोपवली जाते. संघ कोणतीच गोष्ट थोपवू इच्छित नाही. खूप विचारविमर्श करून संघ स्थापनेची घोषणा झाली. आपला देश विश्वगुरू बनण्यासाठी समाजाला योग्य विचाराने रस्ता दाखविण्याचे काम संघ करीत आहे. या नाटकाच्या माध्यमातून समाजाला संघाचा परिचय होईल. स्वयंसेवकांनाही चिंतनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित राहून संपूर्ण नाटक पाहिले. ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकात संघाची स्थापना कोणत्या परिस्थितीत व कशासाठी करण्यात आली इथपासून ते संघाची ध्येय धोरणे, शाखांचा विस्तार स्वातंत्र्य संग्रामात संघाचे स्थान आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी संघ स्थापनेसाठी केलेले परिश्रम व संघाच्या विस्तारासाठी उपसलेले कष्ट यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाची धुरा कशी यशस्वीरीत्या सांभाळली यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघाला दिलेल्या भेटीचे प्रसंगही यात अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर आलेले निर्बंध, १९४८ मध्ये पाकशी झालेल्या युद्धात स्वयंसेवकांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार व काश्मीरच्या विलिनीकरणात संघाने दिलेले योगदान या सर्वबाबींवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत