शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विना राॅयल्टी रेती वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील व्याहाड पेठ शिवारात शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री २ वाजताच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील व्याहाड पेठ शिवारात शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हिंगणा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नागपूर-अमरावती महामार्गावरून अमरावतीच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी व्याहाड पेठ शिवारात नाकाबंदी करीत अमरावतीच्या दिशेने जाणारे एमएच-२७/बीएक्स-९७९९, एमएच-२७/बी-६६९९ व एमएच-३०/एव्ही-१००८ क्रमांकाचे तीन ट्रक थांबवून झडती घेतली. तिन्ही ट्रक ताडपत्र्यांनी झाकून हाेते.

त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी तिन्ही ट्रक रेतीसह जप्त केले. शिवाय, अमीन कलंदर शाह (३८, रा. हैदरपुरा, अमरावती), कलीम निसार खान (४६, रा. पठाणपुरा, अमरावती), शेख सद्दाम शेख मोहम्मद (२८, रा. वलगाव रोड, अमरावती), शेख सोहेल हमीद (२६, रा. पठाण चौक, अमरावती) व अविनाश शिरभाते (२३, रा. अमरावती) यांना अटक केली.

त्यांना न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार बळीराम परदेशी यांनी दिली असून, त्यांच्याकडून एकूण ४६ लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक सारिन दुर्गे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास कुथे, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, अनिल झाडे, कैलास चव्हाण, संजय तायडे, प्रवीण फलके, सुनील मस्के, प्रदीप ढोके, सतीश येसकर यांच्या पथकाने केली.

...

घाट बंद, उपसा सुरू

ही रेती सावनेर तालुक्यातून आणली असल्याचे तसेच ती कन्हान नदीतील असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व रेतीघाट बंद आहेत. मात्र, रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक सुरूच आहे. हिंगणा पाेलिसांनी तीन दिवसापूर्वी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे ११ ट्रक पकडले हाेते. त्यात एक काेटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला हाेता. रेतीचा अवैध उपसा त्या तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे केला जात असून, आर्थिक संबंधांमुळे महसूल विभागाचे अधिकारी काहीही कारवाई करीत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

210821\20210821_155327.jpg

रेतीने भरलेला ट्रक