शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अभयारण्य, पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा; ताडोबा ५०-६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 07:00 IST

Nagpur News Tadoba ताडोबा येथे पहिल्याच आठवड्यात लोकांची गर्दी उसळली होती पण नंतर हा प्रवाह काहपसा कमी झाला. मात्र इतर ठिकाणचे सुनेपण तर अद्याप संपलेले नाही.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा महिन्याच्या बंदिवासानंतर अभयारण्यांचे गेट सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा पण या स्थळांवर पर्यटकांची प्रतीक्षा कायम आहे. कोरोनाच्या कंटाळवाण्या स्थितीतून बाहेर येत प्राणिदर्शनासाठी नागरिकांचे पाय वळतील, अशी अपेक्षा होती पण भीती कायम आहे. ताडोबा येथे पहिल्याच आठवड्यात लोकांची गर्दी उसळली होती पण नंतर हा प्रवाह काहपसा कमी झाला. मात्र इतर ठिकाणचे सुनेपण तर अद्याप संपलेले नाही.राज्य शासनाने १ ऑक्टोबरपासून सर्व अभयारण्ये, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सुरू करण्याची परवानगी दिली. वनविभागाने लोकांना संसगार्चा धोका टाळण्यासाठी नियमांची कडेकोट व्यवस्था उभारली. पहिल्याच आठवड्यात ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य पर्यटकांनी फुलले होते. पहिले तीन दिवस चांगलीच गर्दी उसळली. वनविभागाच्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी ३२० पर्यटकांनी हजेरी लावली व ८० सफारी वाहन (जिप्सी) अभयारण्यात फिरले. पुढचे तीन-चार दिवस ही गर्दी कायम होती. विकएंडला पुन्हा पर्यटकांच्या उपस्थितीने उत्साह वाढला. पर्यटकांचा सकारात्मक व सुरक्षित प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील बुकिंग ६०-७० टक्क्यापर्यंत वाढल्याचे ताडोबाचे फिल्ड अधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. त्यामुळे ताडोबातील वाघांची भुरळ पर्यटकांमध्ये आजही कायम आहे, असे चित्र होते.मात्र दुसऱ्या आठवड्यापासून गर्दी ओसरत असल्याची स्थिती आहे. कदाचित आर्थिक अडचणी व स्थितीचा विचार करीत सध्या पर्यटकही दूर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे पेंच व बोर अभयारण्यात मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जाणकारांच्या मते, हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटनासाठी लोकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांची गर्दी वाढलेली असते. यावेळी मात्र विदेशी पर्यटकांची उपस्थिती शून्य आहे. आता १० वषार्खालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला स्थिती सुधारण्याची आशा आहे.सहा महिन्यात तीन कोटींचे नुकसानमार्च ते जून महिना पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र कोरोना संक्रमणामुळे १८ मार्चपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद झाले व संपूर्ण सिझन वाया गेला. या काळात विभागाचे तीन कोटींच्यावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गाईड, सफारी वाहनचालक, रिसॉर्ट मालक यांचाही रोजगार व शेकडो लोकांचा व्यवसाय बुडाला होता. पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता.१५ नंतर कॅन्टर बुकिंग ऑनलाईनअभयारण्यात फिरण्यासाठी पर्यटकांची ओपन बसप्रमाणे असलेल्या कॅन्टरला पसंती असते. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टरचे गेटवर बुकिंग करण्यात येत होते. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कॅन्टर फुल्ल असल्याचे सांगून घोळ होत होता. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबरपासून कॅन्टर बुकिंग ऑनलाईन करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.ताडोबाशी जुळलेल्या गाईड, जिप्सीचालक, रिसॉर्ट मालक अशा शेकडो लोकांसाठी कोरोना काळातील पाचसहा महिने अत्यंत कठीण गेले होते. पर्यटन सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या आठवड्यात उत्साह होता. आता गर्दी ओसरली आहे पण पुढे स्थिती सुधारेल, अशी आशा आहे.- निखिल अभ्यंकर, रिसॉर्ट चालक

 

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प