लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक काळात नव्या सोशल माध्यमांमुळे वृत्तपत्र माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. सोबतच शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी सलून स्पा, जीम, योग, ध्यान या गोष्टींचीही आवश्यकता आहे. मात्र आपण सर्व उच्च परंपरा व संस्कृती असलेल्या माध्यमांमध्ये काम करतो, त्यामुळे हे सर्व करताना पत्रकारितेचे पावित्र्य अबाधित राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.आर.टी. मार्ग, सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब आॅफ नागपूरमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सलून स्पाचे विजय दर्डा यांच्या हस्ते सोमवारी उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, वनराईचे गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, रिपोसो स्पाचे संचालक सतीश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सुधाकर देशमुख व अनिल देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रेस क्लबचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी केले. सरिता कौशिक यांनी आभार मानले.
पत्रकारितेचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:23 IST
आधुनिक काळात नव्या सोशल माध्यमांमुळे वृत्तपत्र माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. सोबतच शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी सलून स्पा, जीम, योग, ध्यान या गोष्टींचीही आवश्यकता आहे. मात्र आपण सर्व उच्च परंपरा व संस्कृती असलेल्या माध्यमांमध्ये काम करतो, त्यामुळे हे सर्व करताना पत्रकारितेचे पावित्र्य अबाधित राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
पत्रकारितेचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे
ठळक मुद्देप्रेस क्लबच्या कार्यक्रमात विजय दर्डा यांचे प्रतिपादन