शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

समता सैनिक दलाचे अडीच हजार सैनिक देणार सेवा

By admin | Updated: October 11, 2015 03:14 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन: सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांना करणार सहकार्यनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना समता सैनिक दलाची मोठी मदत होईल. यंदा दलाचे अडीच हजार सैनिक दीक्षाभूमीवर सुरक्षा व्यवस्था सांभाळतील. यासंदर्भात समता सैनिक दलाची विदर्भस्तरीय बैठक नंदनवन येथील समता बुद्धविहारात पार पडली. दीक्षाभूमी येथे २२ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. त्यासाठी दोन दिवसापूर्वीपासूनच बौद्ध, आंबेडकरी अनुयायी येथे येतात. मुख्य सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत लोकांची गर्दी असते. तेव्हा २१ ते २३ आॅक्टोबरदरम्यान दलाचे सुरक्षा व्यवस्था शिबिर दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात येईल. भदंत नागदीपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होईल. बोधानंद गुरुजी हे शिबिर प्रमुख राहतील. तर राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, महासचिव एम.आर. राऊत, प्रमिला सिद्धार्थ, जीओसी प्रदीप डोंगरे, श्रेयस सहारे, खुशाल लाडे, राजकुमार वंजारी, पृथ्वी मोटघरे, प्रा. गोवर्धन वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ हजार सैनिक गणवेशात सेवा देतील. तर ५०० सैनिक हे गर्दीत राहून अनुयायांना कुठलाही त्रास हेणार नाही, याची काळजी घेतील. तत्पूर्वी १४ आॅक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी नागपूरला येणार आहेत. त्यालाही सुरक्षा पुरविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत भदंत नागदीपंकर, प्रदीप डोंगरे, राजकुमार वंजारी, बोधानंद गुरुजी, दुर्गेश थूल, पृथ्वी मोटघरे, प्रा. गोवर्धन वानखेडे, अ‍ॅड. राजू शेंडे, मुथीन मेश्राम, नरहरी मोटघरे, युवराज कांबळे, सुनील रंगारी, जनार्दन सुखदेवे, रमेश ढवळे, अनिल बावनगडे, चिंटू गजभिये, जयंता सहारे, प्रा. भावेश माटे, सुमित्रा सुखदेवे, हिरा मोटघरे, आदी सैनिक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)