शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींच्या समर्पणभावाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:01 IST

अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.

ठळक मुद्देअडचणीतील प्रवाशांना देतात विनाशुल्क सेवा

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.अडचणीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील कुली तत्पर असतात. मागील महिनाभरात घडलेल्या दोन घटनांनी कुलींचा सेवाभाव समोर आला. ७ जूनला पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये बिघाड झाला. एसी दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रशासनाने नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वाखाली सुशील अवतार, सोनु गायकवाड, लखन लाल सैनी, नौशाद खान, नफीस अहमद, छोटे खान, अमर सिंह जोगी, नितीन बारामती आदी कुलींनी नि:शुल्क सेवा देत एक रुपयाही न घेता सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये पोहोचविले. कुलींच्या सेवेबद्दल प्रवाशांनीही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. ही एकच घटना नव्हे तर १५ दिवसांपूूर्वी गोरखपूर-यशवंतपूर गाडीचे चाक तुटल्यानंतर ही गाडी सोनखांब-कोहळी स्थानकादरम्यान तब्बल ५ तास जागेवरच उभी होती. या गाडीचे चाक तुटलेल्या कोचमधील प्रवाशांचे सामानही कुलींनी विनाशुल्क हलविण्यास मदत केली होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर असंख्य वेळा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली करत राहतात. पैशासाठी एकमेकांचा गळा कापण्याच्या युगात कुलींचा हा सेवाभाव समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.

११ लाखाचे दागिने केले होते परतदोन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील कडील भागात एक महिला आपली बॅग पोलीस बुथजवळ विसरली.बराच वेळ होऊन सुटकेसजवळ कोणीच येत नसल्याचे पाहून कुली अब्दुल मजीद यांनी ती सुटकेस आपल्या ताब्यात घेतली. बॅगमध्ये वाजत असलेला मोबाईल उचलून संबंधीत महिलेला बॅग आपल्याजवळ असल्याचे सांगितले. ती महिला आल्यानंतर त्या बॅगमध्ये ११ लाखाचे दागिने असल्याचे समजले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर