शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इंदिरा गांधी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:23 IST

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शासकीय कार्यालयांसह विविध संघटनांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयासह विविध संघटनांची आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शासकीय कार्यालयांसह विविध संघटनांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.विभागीय आयुक्त कार्यालयमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेतली. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, के.एन.के. राव, सहायक आयुक्त मनिषा जायभाये तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालयमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, सुजाता गंधे, राजलक्ष्मी शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महावितरणमाजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, सहायक महाव्यस्थापक (मा.स.) वैभव थोरात, व्यस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस सेवादलमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस सेवादलने त्यांना आदरांजली अर्पण केली. सेवादलचे सचिव मीरसाहब सोहेब अली प्रमुख अतिथी होते. रामगोविंद खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मो. कलाम, डॉ. प्रकाश ढगे, डॉ. अनिल वाघ, डॉ. रमजान अन्सारी, पंकज पांडे, देवेश गायधने, प्रशांत रिनके, मच्छिंद्र जीवने, प्रमोद रामटेके, अरुण अनासाने, प्रकाश कुंटे, दशरथ ताकोदे आदींनी आदरांजली अर्पण केली.पश्चिम नागपूर झोपडा सुधार समितीमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम नागपूर झोपडा सुधार समितीतर्फे राजीव गांधी औद्योगिक केंद्र गांधीनगर येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. सुंदरलाल बनवारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राजा कुरवते, मधुकर पोपळघट, रोहीत लिल्हारे, विजय कार्लेकर, महादेवराव चौधरी, कैलास कनोजिया, नितीन श्रीबांसरे, सुरेश भलावी, राजा तुमडाम, पापा गजक, अतुल घोम, पंकज सलामे, राजेश बनवारी, हिना मंदवार, कल्पना लिल्हारे, सुनिता चौधरी, माया राऊत आदी उपस्थित होते.दक्षिण नागपूरदक्षिण नागपूरच्यावतीने नवीन सुभेदार, राजा मारोती गार्डन परिसरात इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संध्या ठाकरे, रमेश गिरडकर, राजेश बेलखोडे, चक्रधारी दुरुगकर, रमेश काकडे, बबनराव डेकाटे, चरणदास सोमकुंवर, आशा कुर्वे, डॉ. पुष्पा दुरुगकर, रंजना विरुळकर, धनश्री बावणे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Nagpur Divisional Commissioner Officeनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयIndira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष