शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सलमानचा जामीन फेटाळला

By admin | Updated: September 23, 2015 06:51 IST

मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मधील मोहित मार्टिन पीटर याच्या खूनप्रकरणी शेख सलमान शेख रहीम याचा

नागपूर : मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मधील मोहित मार्टिन पीटर याच्या खूनप्रकरणी शेख सलमान शेख रहीम याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. २६ जून २०१५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मोहित मार्टिन पीटर आणि मिखील मायकल फ्रान्सिस हे दोघे जगदंबा हाईटस्स्थित मार्लिन बिल्डिंग मटेरियल ट्रान्सपोर्टच्या दुकानात बसले असता १०-१२ जणांनी सशस्त्र हल्ला करून पीटरचा भीषण खून केला होता आणि दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेली होती. तपासादरम्यान पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तलवार, फरसा, चाकू, गुप्ती इत्यादी शस्त्रे जप्त केली होती. जामीन मागणारा आरोपी शेख सलमान याने एमएच-३१-डीआर-०२१९ क्रमांकाची मोटरसायकल आरोपी ब्रायन याला गुन्हा करण्यासाठी दिली होती. सलमान हा व्यक्तिश: या गुन्ह्यात सहभागी होता. तो मृताच्या एकूणएक हालचाली आरोपींना देत होता. बचाव पक्षाच्या वकिलाने आपल्या युक्तिवादात सांगितले की, आरोपी सलमानची गुन्ह्यातील सहभागाबाबत एफआयआरमध्ये नोंद नाही. त्याच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. त्याचा पूर्वगुन्हेगारी इतिहासही नाही. केवळ सीडीआर आणि वाहनाच्या आधारावर त्याला आरोपी बनविण्यात आले. सरकार पक्षाने असा युक्तिवाद केला की, आरोपीचे जरी एफआयआरमध्ये नाव नव्हते तरीही त्याला जखमी साक्षीदार आणि फिर्यादीने प्रत्यक्ष ओळखपरेडदरम्यान ओळखले आहे. खुनाची ही घटना दाट लोक वसाहतीत घडली होती. त्यावेळी फिर्यादी फ्रान्सिस हा आपल्या वडिलांच्या दुकानात हजर होता. मृताच्या शरीरावर शस्त्रांचे एकूण ७१ घाव होते. त्यामुळे आरोपींचा मृताला ठार मारण्याचाच हेतू होता, असे प्रथमदर्शनी दिसते. प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील एम. एम. पिंपळगावकर तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मोहम्मद फजल यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)