शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

झोपेच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री

By admin | Updated: May 25, 2017 02:07 IST

गांधीबाग औषध मार्केटमधील एका होलसेल औषध विक्रेत्यावर अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट बिलाचा वापर : होलसेल व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीबाग औषध मार्केटमधील एका होलसेल औषध विक्रेत्यावर अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास गोपीकिसन सारडा या होलसेल औषध विक्रेत्याचे अजित फार्माटिक्सचे दुकान आहे. आरोपी सारडा याने १५ एप्रिल ते मे महिन्यापर्यंत अवैधरीत्या झोपेच्या गोळ्यांची विक्री केली. परंतु खऱ्या खरेदीदारांऐवजी बोगस मेडिकल स्टोअर्सच्या नावाने औषध विकल्याचे बिल तयार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून अनेकजण नशा करतात त्यामुळे या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणे कायद्याने गुन्हा आहे. हा गोरखधंदा एका रिटेलरने उघड केल्याची माहिती आहे. आरोपीने मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांची विक्री करून मेडिकल स्टोअर्स आणि रिटेलरसह ६८ खरेदीदारांच्या नावाने बिल तयार केले होते. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. परंतु अन्न व औषध प्रशासन विभागानुसार ६८ खरेदीदार रिटेलरपैकी २ मेडिकल स्टोअर्स संचालकांनी अजित फार्माटिक्समधून झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या नसल्याचे सांगितले. ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीरतेने घेतली नाही. ठोक विक्रेत्याने मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांची विक्री केल्यास परवाना निलंबित होऊ शकतो. त्यानंतर हे प्रकरण इंटेलिजन्स ब्युरो (मुंबई) पर्यंत पोहोचले. मुंबईच्या चमूने नागपुरात येऊन याचा तपास केला. यात इंदोरा, पाचपावलीच्या मेडिकल स्टोअर्सच्या नावाने बोगस बिल तयार केल्याचे उघड झाले. संबंधित दुकानदारांनी अजित फार्माटिक्समधून झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक स्वाती भरडे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१, ४६४ आणि औषध निर्माण कायदा १९४० नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरण गंभीर नाहीयाबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक स्वाती भरडे यांनी सांगितले की, प्रकरणाच्या माहितीसाठी सहायक आयुक्तांशी संपर्क साधा. सहायक आयुक्त मोहन केकतपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण गंभीर नसल्याचे सांगितले. होलसेल विक्रेत्याने ६८ रिटेलरच्या नावाने औषधाचे बिल तयार केले होते. परंतु ६६ रिटेलरने औषध खरेदी केल्याची बाब मान्य केली आहे. फक्त २ रिटेलर औषध खरेदी केले नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कोण खरे बोलत आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. झोपेच्या गोळ््यांचा नशेसाठी वापरतज्ज्ञांच्या मते देशात युवा पिढी नशेच्या आहारी गेली असून चरस, अफीम, गांजा, हेरॉईनसारख्या मादक पदार्थांचे सेवन करीत आहे. परंतु जे युवक महागडी नशा करू शकत नाहीत, ते मेडिकल स्टोअर्सकडे वळून झोपेच्या गोळ््या खरेदी करतात. झोपेच्या गोळ््या शेड्युल ड्रगमध्ये येतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्या विकण्यात येत नाहीत. त्यामुळे शेड्युल ड्रगच्या विक्रीचा हिशोब ठेवणे विक्रेत्यांसाठी आवश्यक आहे. परंतु काही विक्रेता मनमानी किंमत आकारून झोपेच्या गोळ््यांची विक्री करून खऱ्या खरेदीदारांऐवजी इतर मेडिकल स्टोअर्सच्या नावाने बिल तयार करतात.