शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपुरात कोट्यवधींच्या शेतीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:22 IST

झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे आरोपी फरार, पोलिसांची शोधाशोधकळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो जगदीशनगर (काटोल मार्ग) मधील कालिमाता नगरात राहतो. प्रेमशंकर सीताराम चौधरी (वय ६५) हे शनी मंदिरजवळ रांची (झारखंड) येथे राहतात. त्यांचा पुतण्या अखिलेश प्रयागराज चौधरी येथील वर्धमाननगरातील श्रीजी दर्शन अपार्टमेंटमध्ये राहतो. अखिलेश यांनी मौजा पावनगाव (ता. कामठी) येथील उमेश श्रावण पिंपळखेडे, विकास श्रावण पिंपळखेडे आणि मनोज श्रावण पिंपळखेडे यांची शेती (क्र. ४९, खसरा नं. ५१/ १) खरेदी केले होते. तेव्हापासून शेतीची मालकी अखिलेश चौधरी यांच्याकडे होती. २०१४ मध्ये प्रेमशंकर चौधरी झारखंडमधून नागपुरात आले. त्यांनी ही शेती त्यावेळी पुतण्याकडून बघितली अन् विकत घेतली. २७ लाख, ५१ हजारात हा सौदा झाला अन् त्याचे रीतसर विक्रीपत्रही करण्यात आले.शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर या आरोपीने अलिकडे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती जमीन संबंध नसताना सुनील बोरकर यांना विकली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पीएसआय पाटवदकर यांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले असून, त्यांनी आपल्या बचावासाठी काही दलाल कामी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर हा ७५ वर्षांचा आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस शनिवारी त्याच्या घरी गेले होते. मात्र, तो आढळला नाही.

मोठी टोळी सहभागीया प्रकरणात पोलिसांनी तूर्त एकच आरोपी बनविला आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात एक मोठी टोळीच सहभागी असल्याची चर्चा आहे. या टोळीने अशा प्रकारे कोट्यवधींच्या अनेक जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे जमीन विकून या टोळीतील प्रत्येकाने कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची कसून तपासणी झाल्यास भूमाफियांशी साटेलोटे असलेले एक रॅकेटच पोलिसांच्या हाती लागू शकते, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी