शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समाजमन रोगमुक्त करण्यासाठी संतांची ‘थेरपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:25 IST

समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली.

ठळक मुद्देराजन गवस : ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’वर राज्यस्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली. समाजाचे रोगनिदान करणाºया या संत पद्धतीचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वाडी येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील ग्रामगीता भवनात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे तसेच माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य जीवन दोंतुलवार, मराठी विभागप्रमुख डॉ. कल्पना बोरकर हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. स्वत:च्या जगण्यातील नैतिकता शब्दांत उतरवत संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी संतांनी साहित्याची वेगवेगळी उपचार पद्धत वापरली. या माध्यमातून त्यांनी लोकमानस बदलण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन गवस यांनी केले. धार्मिक, सांस्कृतिक संघर्ष होत असताना संतांनी भक्तिचळवळ उभारली होती. ती तेव्हाच्या काळाची गरज होती.व्यवस्थेचा विरोध करून समाजाला जोडण्याचा प्रयत्न करणाºया संतांची ही बंडखोरीच होती. संत साहित्य हे केवळ अध्यात्म व धर्मापुरते मर्यादित नाही तर ते संतांच्या चळवळीचे प्रभावी साहित्य होते. संतांनादेखील समाजाने नाकारले नाही तर सर्वांनी त्यांना समान वागणूक दिली, अशी भूमिका बीजभाषणादरम्यान प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी मांडली.या चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध संशोधक डॉ. अशोक राणा होते तर डॉ. अलका गायकवाड, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी शोधनिबंध सादर केला. सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक जीवन दोंतुलवार यांनी केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभार मानले....तर संस्कृत का लादायचे ?नागपूर विद्यापीठासोबतच संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार सांभाळणाºया डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी संस्कृत भाषेसंदर्भात मतप्रदर्शन केले. रामटेक येथे कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारत असताना संस्कृत मंत्रोच्चार करण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मला यातील एकाचाही अर्थ समजला नाही. अशीच अवस्था इतरांचीदेखील होती. जर समजतच नसेल तर संस्कृत लादणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंड होतेयावेळी डॉ.अक्षयकुमार काळे यांनी आपली भूमिका मांडली. धर्मव्यवस्था ही समाजाच्या हितासाठीच होती. मात्र त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंडदेखील होते. त्याकाळी पुरोहितशाही बळावली होती. संस्कृत भाषेतील ज्ञान पुरोहितांपुरतेच मर्यादित राहिले. ही मक्तेदारी संपवण्यासाठी तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार खालच्या मानल्या जाणाºया वर्गातील संतांनी बंड पुकारले. महाराष्ट्रीयन संत परंपरा म्हणजे स्त्री आणि क्षुद्रांचे संमेलनच होते. संतांमध्ये बहुजनांविषयी कळवळा व जिव्हाळा होता, असे डॉ. काळे म्हणाले.