शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात खोल रुतलेला विळा सुरक्षित बाहेर : महिलेला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:58 IST

जोरदार वार केल्यामुळे एका ६५ वर्षीय महिलेच्या डोक्यात खोलवर रुतलेला विळा यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये गुरुवारी ही शस्त्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्देमेडिकलच्या ट्रॉमात यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जोरदार वार केल्यामुळे एका ६५ वर्षीय महिलेच्या डोक्यात खोलवर रुतलेला विळा यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये गुरुवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे महिलेला जीवनदान मिळाले.मीराबाई असे महिलेचे नाव असून त्या आसोली (पुसद, जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहेत. अत्यंत गरीब असलेल्या मीराबाई रात्री घरात झोपलेल्या असताना अज्ञात इसमाने त्यांच्यावर विळ्याने जोरदार वार केला. तो विळा मीराबाईचा उजवा डोळा फोडून डोक्यात खोल रु तला. त्यानंतर त्यांना लगेच मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मीराबाईची अवस्था पाहून ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टर्स व परिचारिकांनी वेगात हालचाली केल्या. केवळ दीड तासामध्ये सर्व तपासण्या पूर्ण करून मीराबाईला शस्त्रक्रिया कक्षात हलविण्यात आले. त्यानंतर न्यूरोट्रॉमा विभाग प्रमुख डॉ. पवित्र पटनाईक यांच्या नेतृत्वातील चमूने अवघ्या एक तासात डोक्यात रुतलेला विळा सुरक्षितपणे बाहेर काढला. त्यानंतर फुटलेला डोळा बाहेर काढणे, जखम शिवणे यासह इतर आवश्यक उपचार करण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे मीराबाईला नवीन जीवन मिळाले.शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या चमूत न्यूरोसर्जन डॉ. अंकुर संघवी, डॉ. रामानुज काबरा, डॉ. पलक जयस्वाल, अ‍ॅनेस्थिया तज्ज्ञ डॉ. ढोमणे, डॉ. सोमा चाम, डॉ. वैद्य, डॉ. विशाखा, डॉ. नेहा, डॉ. हर्ष, आॅफथॅलमॉलॉजिस्ट डॉ. दिव्यांजना, डॉ. शीतल, मॅक्सिल्लोफेशियल सर्जन डॉ. विकास मेश्राम, निवासी डॉक्टर शुभम, रोशन, मकरंद, परिचारिका प्रणिता, स्वाती, रेडिओलॉजिस्ट शिवकुमार राठोड, जवाहर राठोड यांचा समावेश होता.मेंदूला धोका होताही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट स्वरुपाची होती. या शस्त्रक्रियेमुळे मीराबाईच्या जीवाला धोका होता. विळा बाहेर काढताना मेंदूला कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही याची काळजी घेणे हे मोठे आव्हान होते. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. मीराबाईला नवीन जीवन मिळाले याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. डॉ. पवित्र पटनाईक

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय