शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

गर्भवती, स्तनदा माता, मुलांसाठी हाेणार सुरक्षित उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : गर्भवती महिला, स्तनदा मातांना बिनदिक्कतपणे थाेडा विरंगुळा मिळेल, लहान मुलांना सुरक्षितपणे खेळता येईल व त्यांच्यासाेबत येणाऱ्या आजी-आजाेबांनाही ...

नागपूर : गर्भवती महिला, स्तनदा मातांना बिनदिक्कतपणे थाेडा विरंगुळा मिळेल, लहान मुलांना सुरक्षितपणे खेळता येईल व त्यांच्यासाेबत येणाऱ्या आजी-आजाेबांनाही मुलांबाबत काळजी न राहता निवांत वेळ घालवता येइल, असे एखादे तरी ठिकाण नागपुरात आहे का? असा प्रश्न केल्यास नकारच मिळेल. खरतर स्मार्टसिटीसाठी हे आव्हानच आहे. ही गरज पूर्ण करण्याची संधी स्पर्धेच्या माध्यमातून नागपूरला मिळाली आहे. याअंतर्गत सक्करदरा उद्यानाचा कायाकल्प करून असे ठिकाण विकसित करण्याचा प्रकल्प स्वीकारला गेला आहे.

केंद्र शासनाच्या नगरविकास व गृहनिर्माण मंत्रालयातर्फे ‘नर्चरिंग नेबरहूड चॅलेंज’ देशभरातील शहरांना दिले हाेते. यामध्ये देशभरातून ६३ शहरांनी सहभागी हाेऊन प्राेजेक्ट पाठविले हाेते. नागपूर मनपाच्या स्मार्टसिटी, पर्यावरण विभागानेही अशाप्रकारचे स्थान विकसित करण्याचा प्रकल्प सादर केला हाेता. त्यानुसार स्पर्धेच्या पहिल्या राउंडमध्ये महाराष्ट्रातून नागपूरच्या एकमेव प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाने यासाठी सक्करदरा तलावाजवळच्या उद्यानाची निवड करून प्रकल्प तयार केला आहे. प्रकल्पाच्या नाेडल अधिकारी व विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक डाॅ. प्रणीता वाट-उमरेडकर यांनी लाेकमतशी बाेलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. केवळ इन्फ्रास्ट्रक्चरल विकास नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने राहण्यायाेग्य (लिव्हेबल) शहर विकासाच्या संकल्पनेचा हा भाग असल्याचे त्या म्हणाल्या. जुलै २०२३पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केंद्रातर्फे सर्वाेत्तम दहा शहरांची निवड हाेणार आहे.

काय आहे चॅलेंज

- गर्भवती महिला शुद्ध हवेत फिरू शकतील काय, स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करण्याची व्यवस्था आहे काय

- ० ते ५ वर्षे वयाेगटातील मुलांना रस्त्यावर अपघात किंवा इतर भीती न ठेवता खेळता येईल.

- ज्येष्ठांना एका ठिकाणी बसून मुलांना खेळताना बघता येईल. त्यांच्या सुरक्षेसाठी धावपळ करावी लागणार नाही.

- उत्साह वाढविणारे खेळाचे साहित्य व इतर व्यवस्था. कलागुणांना वाव देणारी व्यवस्था.

- उन्हाळ्यातही थंडावा राहील, अशी व्यवस्था व तशाप्रकारची झाडे असणे. उन्हातही गरम हाेणार नाही अशा टाइल्स व मटेरियल आहेत काय.

- संपन्न जैवविविधता, कमीतकमी कार्बन उर्त्सजन राहील, अशी व्यवस्था.

सक्करदरा उद्यानाची निवड

डाॅ. वाट यांनी सांगितले, या प्रकल्पासाठी स्मार्टसिटीच्या पथकाने शहरात सर्वेक्षण करून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सक्करदरा तलाव उद्यानाची निवड करण्यात आली. नेहरूनगर झाेनच्या प्रभाग ३०मध्ये हा एरिया येताे. २ ते ३ किलाेमीटरमध्ये पसरलेल्या परिसराची लाेकसंख्या ६३,५६४ एवढी आहे.

- या ठिकाणी जवळजवळ दाेन उद्याने आहेत. त्यामुळे दाेन्हींना मिळवून एकत्रितपणे स्मार्ट व्यवस्था करता येइल.

- जवळ प्राथमिक आराेग्य केंद्र आहे, जे दुरवस्थेत आहे. प्रकल्पात त्याचाही समावेश करण्यात येईल.

- जवळ आंगणवाडी असल्याने मुलांच्या शैक्षणिक गाेष्टीची पूर्तता हाेईल.

- वाॅकर्स स्ट्रीट निर्मिती, खेळण्यासाठी उत्साही व्यवस्था तसेच शैक्षणिक व कलात्मक गाेष्टी करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

- थंडावा देणारी झाडे व टाइल्स लावण्यात येईल.