शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित रक्ताची हमी असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देअभिमन्यू निसवाडे : ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु रक्तपेढी ते रुग्णाला रक्त लावेपर्यंतची जी सुरक्षा आहे, त्याची हमी परिचारिकेपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग व इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्यूजन मेडिसीन अ‍ॅण्ड ब्लड बँक फेडरेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ या संकल्पनेवर आधारित ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे आयोजन मेडिकलमध्ये करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी ड्रग कंट्रोलर (मुंबई) डॉ. के. बंगारुराजन, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. मोहन केकतपुरे, डॉ. डी. एस. कुंभलकर, डॉ. संजय पराते उपस्थित होते. डॉ. निसवाडे म्हणाले, डॉक्टरांनी रक्ताचे प्रिस्क्रिप्शन देताना काळजी घ्यायला हवी. रुग्णाला किती रक्त हवे, कोणते हवे आहे याचा अभ्यास करून तसे प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.शासकीय रक्तपेढ्यांचा विकास होणे गरजेचेडॉ. संजयकुमार जाधव म्हणाले, प्रगत देशांमध्ये रक्तपेढींचे ‘केंद्रीकरण’ करण्यात आले आहे. यामुळे तिथे रक्ताच्या गुणवत्तेपासून ते इतर सोयी पुरविण्यात अडचणी येत नाही. या उलट आपल्याकडे रक्तपेढीचे ‘विकेंद्रीकरण’ झाले आहे. यामुळे मनुष्यबळापासून ते रक्तांच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाने शासकीय रक्तपेढ्यांचा विकास करायला हवा. या रक्तपेढ्यांना प्रादेशिक दर्जा मिळायला हवा.रॅपीड टेस्ट टाळाडॉ. के. बंगारुराजन यांनी, रक्तपेढीला लागणारी जागा, उपकरणे, कायदा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, रक्तपेढ्यांनी रक्ताच्या गुणवत्तेला घेऊन नेहमीच जागरुक रहावे. विशेषत: वेळ कमी असल्याचे कारण देऊन रक्ताची ‘रॅपीड टेस्ट’ करू नये. कारण त्याचे रिझल्ट योग्य येत नाही. कागदोपत्री पुरवा राहात नाही. यामुळे नियमानुसार ‘एलायझा’ चाचणीच करावी. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांनी रक्तपेढीत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. कीर्ती जयस्वाल व डॉ. सुखनिक खुराणा यांनी केले तर आभार डॉ. शीला मुंधडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. व्ही.आर. रवी, डॉ. हरीश वरभे, अशोक पत्की आदींनी सहकार्य केले.