शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नृत्यासोबतच साधली अभ्यासाची साधना

By admin | Updated: June 14, 2017 01:13 IST

साधारणत: दहावीचे वर्ष आले की विद्यार्थ्यांसमोर कुटुंबीयांकडून अभ्यासासाठी दुसरा पर्यायच देण्यात येत नाही.

‘पायल’चे प्रेरणादायी यश : राष्ट्रीय पातळीवरील नृत्यांगनेची अभ्यासातही भरारी : वडिलांनी पोटाला चिमटा काढून शिकविले योगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साधारणत: दहावीचे वर्ष आले की विद्यार्थ्यांसमोर कुटुंबीयांकडून अभ्यासासाठी दुसरा पर्यायच देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांचे छंद, त्यांची आवड यांना बाजूला सारण्यात येते. मात्र घरची परिस्थिती बेताचीच असून तिच्या वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन तिचा छंद जपला. तिनेदेखील घरच्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली. शास्त्रीय नृत्यात राष्ट्रीय पातळीवर स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करत असताना तिने अभ्यासाचा तोल ढळू दिला नाही. अगदी परीक्षेच्या महिन्याभर अगोदर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली. महिनाभर शाळा बुडली. मात्र सर्व आव्हानांचा सामना करत तिने अभ्यासासोबतच नृत्याचा ताल सांभाळला अन् दहावीत प्राविण्यश्रेणी प्राप्त केली. नावातच रुणुझुणू नाद असलेल्या पायल प्रसाद सप्रे हिने आदर्श प्रस्थापित केला आहे. सेंट पॉल शाळेची विद्यार्थिनी असलेली पायल ही शास्त्रीय नृत्यांगना असून देशभरात अनेक स्पर्धांमध्ये तिने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. गाण्याचीदेखील तिला आवड असून त्याच्यादेखील तिने परीक्षा दिल्या आहेत. दहावीचे वर्ष मात्र तिचे दुहेरी परीक्षा घेणारे ठरले. एकीकडे तिला राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करायचे होते, तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत यश मिळवून घरच्यांचे स्वप्न साकारायचे होते. परीक्षेच्या महिन्याभर अगोदर पंजाबमध्ये राष्ट्रीय ‘यूथ फेस्टिव्हल’साठी ती गेली होती. याच्या सरावासाठी ती एक महिना शाळेतदेखील जाऊ शकली नाही. मात्र तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. स्वअभ्यासातून तिने यश खेचून आणले. तिला दहावीला ७८ टक्के गुण प्राप्त झाले. परिस्थितीमुळे शिकवणी लावता आली नाही पायलच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. तिचे वडील हे ‘पेंटर’ असून ‘आॅर्डर’ नसेल तेव्हा ते इतर कामेदेखील करतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी एकही नवा कपडा घेतलेला नाही. मात्र पंंजाबमधील स्पर्धेसाठी पोटाला चिमटा घेऊन महागडा ड्रेस घेतला. माझे वडील प्रसाद व आई भारती हे माझे आदर्श आहेत. नृत्य आणि अभ्यासात मी पुढे जावे, असे त्यांचे स्वप्न आहे. परिस्थितीअभावी मला शिकवणी लावणे शक्य नव्हते. मात्र स्वअभ्यासावर मी भर दिला. वेळ मिळेल तेव्हा मी अभ्यास करत होते. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. मात्र तरीदेखील स्वत:ला सिद्ध करून दाखविल्याचे समाधान आहे, असे पायलने सांगितले.