शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

सदर पोलीस ठाण्यात स्फोट

By admin | Updated: May 27, 2017 02:37 IST

सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

उपराजधानीत खळबळ पोलीस प्रशासनाची धावपळ पत्नी पीडिताचे कृत्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपराजधानीत देशभरातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मांदियाळी जमणार असताना ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. मात्र, हा स्फोट घडवून आणलेल्या आरोपीने स्वत:चे नाव चिठ्ठीत लिहून ठेवल्याने अवघ्या दोन तासातच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कुटुंबं कलहामुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचे आणि या अवस्थेतूनच त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला विराम मिळाला. शहरातील अतिमहत्त्वाचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सिव्हिल लाईन्समध्ये मेट्रो रेल्वेचे मुख्य कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. येथून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, उद्योग भवन, प्रशासकीय भवन, गुन्हे शाखा आणि अन्य अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. अशा या महत्त्वाच्या कार्यालयाजवळ सदर पोलीस ठाणे आहे. स्मार्ट पोलीस ठाण्याच्या संकल्पनेनुसार सदर ठाण्यात विविध प्रकारची कामे सुरू आहेत. येथे काम करणारे मुकेश निंबर्ते, अविनाश चौधरी आणि प्रतीक भेदे नामक मजूर पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागातील (उजवीकडे) हिरवळीवर शुक्रवारी दुपारी २.१५ वाजता जेवण करायला बसले. त्यांनी आपले टिफीन उघडले असतानाच अचानक २.१६ वाजता जोरदार स्फोट झाला. त्यामुळे हादरलेल्या या तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील मंडळी धावतच बाहेर आली. ज्या ठिकाणी स्फोट झाला. त्या ठिकाणी छोटा खड्डा पडला. बाकड्याचा काही भाग तुटला आणि कंपाऊंड वॉलच्या पिलरला खड्डा पडला. बाजूची झाडेही काळपट पडली. पोलीस ठाण्याच्या आवारात स्फोट झाल्याच्या वृत्ताने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. ठाणेदार सुनील बोंडे यांनी या प्रकाराची माहिती कळविताच बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह घटनास्थळी पोहचले. त्यांच्या पाठोपाठ दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त महेश सवई, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे आपापल्या ताफ्यासह सदर ठाण्यात पोहचले. पाठोपाठ गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनीही धाव घेतली. स्फोट कसा झाला, का झाला, कुणी केला, त्याची चौकशी सुरू झाली. स्फोट ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणाहून सुमारे ८ ते १० फूट अंतरावर पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळल्या. तीत स्फोट घडवून आणणारा आरोपी मुकेश अंभोरे याने स्वत:चे नावही लिहिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या प्रतापनगरातील घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी बार रूममध्ये स्फोट आरोपीने बिसलरीच्या बाटलीत सुतळी बॉम्बमध्ये वापरली जाणारी बारूद भरून नोझलच्या आधारे पॅकिंग करून सदर ठाण्यात हा स्फोट घडवून आणला. आरोपी मुकेश अंभोरे याने २०१० मध्ये जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांच्या कक्षात (बार रूम) टायमरच्या साह्याने स्फोट घडवून आणला होता. त्याला पकडून पोलिसांनी सदर ठाण्यात आणताच मुकेश अनियंत्रित झाला. तो पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. बळाचा वापर करीत त्याला पोलिसांनी कसेबसे नियंत्रित केले. स्फोटाची चौकशी सुरू स्फोटाच्या घटनाक्रमाची माहिती देताना सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी कुटुंब कलहामुळे त्रस्त झाला आहे. त्यातून तो मनोरुग्णासारखा वागतो. नेहमी इकडेतिकडे फिरत राहतो. त्याने हे कृत्य केल्याचे जवळपास स्पष्ट झाले असले तरी आम्ही चौकशीचे सर्व पर्याय तपासत असल्याचेही ते म्हणाले. या स्फोटाची चौकशी सुरू असून, काळजीचे कुठलेही कारण नसल्याचे ते म्हणाले.