शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उठवळ आणि सडकी मनोवृत्ती

By admin | Updated: May 14, 2014 14:16 IST

ले खिका अरुंधती रॉय ही परवा नागपुरात महात्मा गांधींबद्दल विखारी बोलली. ‘महिलांबाबत गांधी यांचे विचार प्रतिगामी होते आणि अस्पृश्य निवारणाबद्दलची त्यांची

गांधी खचणार नाही किंवा मरणारही नाही!

गजानन जानभोर

ले खिका अरुंधती रॉय ही परवा नागपुरात महात्मा गांधींबद्दल विखारी बोलली. ‘महिलांबाबत गांधी यांचे विचार प्रतिगामी होते आणि अस्पृश्य निवारणाबद्दलची त्यांची भूमिका बघितल्यानंतर त्यांना महात्मा कुणी केले’ असे बरेच काही गांधीजींबद्दल ती इथे बरळली. वास्तविक अरुंधती रॉय हिच्या या विधानाची दखल घ्यावी, एवढी ती मोठी विचारवंत नाही. अरुंधती रॉय म्हणजे विदेशी पैशावर स्वदेश भक्ती करणारी सडक्या मनोवृत्तीची लेखिका. ज्या महात्म्याने स्वदेशीचे व्रत घेतले व आयुष्याच्या अखेरपर्यंत ते जपले त्याच्या महात्म्यपदाचा वाद उभा करावा एवढे हीन पातक दुसरे नाही.‘मी तिथे जाऊन काय करू शकेन, त्याची मला कल्पना नाही, परंतु तिथे गेल्याखेरीज माझे मन शांत होणार नाही’. नौखालीत हा महात्मा हिंदूंना सांगायचा, ‘मृत्यूवर मात करा’, मुस्लिमांना हात जोडून म्हणायचा, ‘तुमच्या अंत:करणातील द्वेषभावनेवर मात करा’ विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष, दोन्ही अनुभव गांधीजींच्या वाट्याला येत होते. मृत्यूनंतरही त्यांची यातून सुटका झालेली नाही. अरुंधती रॉयसारखी विकृत माणसे म्हणूनच असे बरळत असतात.‘चिअर गर्ल्स’ नी त्याची कितीही निंदानालस्ती, टवाळी केली तरी तो खचणार नाही किंवा मरणारही नाही.

गांधीजींनी सगळ्या जातीधर्माची माणसे एकत्र आणली व त्यांना स्वातंत्र्यलढय़ात सहभागी करून घेतले. भारतीय स्त्री समाजजीवनात प्रथमच समोर आली ती गांधीजींनी उभारलेल्या स्वातंत्र्य लढय़ात. हे सत्य सार्‍या जगाने कधीचेच मान्य केले आहे, त्यामुळे अरुंधती रॉयने केलेले विधान हा बाष्कळपणाच आहे.

गांधींवरची टीका नवी नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये दंगली उसळल्या. नौखालीतील दंगलीच्या बातम्या ऐकून गांधीजींचे हृदय विदीर्ण झाले. बापू म्हणाले,

वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहायचे हेच अरुंधतीसारख्यांचे पोटापाण्याचे साधन आहे. काश्मीर हा भारताचा भाग कधीही नव्हता, असे देशविघातक वक्तव्य तिने मध्यंतरी केले आणि त्यातून वाद निर्माण झाला. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे ती नेहमी सर्मथन करीत असते. नक्षलवाद्यांनी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ७५0 आदिवासींची हत्या केली. वर्षभरात ४२ पोलिसांना ठार केले. या देशद्रोह्यांची ही बाई तरफदारी करते.आदिवासींच्या मुलींना पळवणार्‍या आणि त्यांना आपली भोगदासी बनवणार्‍या नक्षलवाद्यांवर ती कधीच टीका करीत नाही. अनेक आदिवासी मायबाप आपल्या मुली पळवल्या जाऊ नयेत म्हणून नक्षलवाद्यांच्या भीतीने गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतात. स्वत:कडे स्त्रीमुक्तीचे पुढारीपण घेणारी आणि तशी मिरवणारी ही अरुंधती याबद्दल एक शब्दही बोलत नाही. तिच्या सर्वच भूमिका संशयास्पद आहेत.

गांधीजींवर टीका करणे ही या देशात फॅशन झाली आहे. या महात्म्यावर टीका केली की लोकांचे लक्ष वेधले जाते, हे त्यांना ठावूक आहे. गांधी कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही. त्याच्यावर कुणीही कुठल्याही स्तरावर जाऊन टीका केली तरीही कुणी भडकत नाही, रस्त्यावर येत नाही किंवा जाळपोळही करीत नाही. त्यामुळे मनात येईल तसे त्याच्याबद्दल बोलले जाते आणि लिहिले जाते. परवा ही अर्धवट समाजसेविका नागपुरात बोलली हा त्याच मानसिकतेचा भाग आहे. अशांना नागपूरकरांसमोर उभे करून व्याख्यान द्यायला लावणे हाही निर्लज्जपणा आहे आणि या अपराधाबद्दल संबंधित आयोजकांना जाब विचारण्याची गरज आहे. गांधी कधी संपणार नाही. माणसांच्या मुक्तीच्या मार्गाने वाट काढीत तो सतत चालत राहणार आहे. अस्वस्थेत, शांततेत, आनंदात, दु:खात कुठेही तो राहीलच. अरुंधती रॉयसारख्या