शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

ग्रामीण महिला अधिक ‘सुशिक्षित’

By admin | Updated: June 27, 2017 01:48 IST

पुरे एक बाळ,जाईल सुखाने काळ... हे सुखी कुटुंबासंदर्भातील घोषवाक्याची प्रचिती नागपूर जिल्ह्यात रुजू लागली आहे.

राजीव सिंग। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरे एक बाळ,जाईल सुखाने काळ... हे सुखी कुटुंबासंदर्भातील घोषवाक्याची प्रचिती नागपूर जिल्ह्यात रुजू लागली आहे. घरातील महिला शिक्षित आणि जागरूक असली तर कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. नागपूर जिल्ह्यातील कुटुंब नियोजनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. शहरी भागातील स्त्री-पुरुषांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष कुटुंब नियोजनासाठी मॉडर्न पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे तथ्य राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आले आहे. नागपूर जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची पद्धत आणि नसबंदी यावर सर्वेक्षण करण्यात आले. तीत ग्रामीण भागात ७८.९ टक्के महिलांनी कुटुंब नियोेजनासाठी सामान्य गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरात हे प्रमाण ६४.७ टक्के इतके आहे. शहर आणि ग्रामीण भाग मिळून ही आकडेवारी ६९.१ टक्के आहे. इतकेच काय तर ग्रामीण भागातील ७७.८ टक्के महिलांनी कुटुंब नियोजनासाठी आधुनिक (मॉडर्न) पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरात हे प्रमाण ६७.९ टक्के इतके आहे. कुटुंब नियोजनासंदर्भातील शस्त्रक्रियेसंदर्भात ग्रामीण भागातील महिलांनी शहरातील महिलांना मागे टाकले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ६८.१ तर शहरात हे प्रमाण केवळ ४५.५ टक्के इतके आहे. कुटुंब नियोजनासंदर्भातील ही आकडेवारी पाहता ग्रामीण भागातील महिला शहरातील महिलांच्या तुलनेत अधिक ‘सुशिक्षित’ असल्याचे म्हणावे लागेल.गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करण्याचे प्रमाण गत काही वर्षांत घटले आहे. यातही ग्रामीण भागातील महिला शहरी महिलांच्या तुलनेत जागरूक आहे. कुटुंब नियोजनासाठी ग्रामीण भागातील १.९ टक्के तर शहरातील १.२ टक्के महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने २०१५-१६ या वर्षांत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्हावार आकडेवारीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात कंडोमचा अधिक वापर कुटुंब नियोजनासंदर्भातील साधनांसाठी कंडोमचा वापर केला जातो. नागपूर जिल्ह्यात १३ टक्के पुरुष कुटुंब नियोजनासाठी कंडोमचा वापर करतात. शहरात हे प्रमाण १५.३ तर ग्रामीण भागात हा आकडा ७.८ टक्के इतकाच आहे. कुटुंब नियोजनात कंडोमचा वापर अधिक व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.शहरात पुरुष तर गावात महिला साक्षरतेत आघाडीवर सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील ८९.६ महिला आणि ९७.४ टक्के पुरुष साक्षर आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पाहता ग्रामीण भागात ९० टक्के तर शहरातील ८९.४ टक्के महिला साक्षर असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांच्या बाबतीत हे उलट ठरले. शहरात ९८ टक्के पुरुष साक्षर आहेत. ग्रामीण भागात ही आकडेवारी ९६.४ टक्के इतकी आहे. १.६ टक्के महिला १९ व्या वर्षी झाल्या आई १९ वर्षे आणि या खालील वयोगटात मुलींना गर्भधारणा होण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात १.६ टक्के इतके आहे. शहरात हे प्रमाण १.८ तर ग्रामीण भागात हे प्रमाण १.३ टक्के इतके आहे. १८ वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकणाऱ्या ७ टक्के महिला जिल्ह्यात दिसून आल्या. शहरात ही आकडेवारी ६.१ तर ग्रामीण ९.५ टक्के इतकी आहे.कुटुंब नियोजनात शहरी महिलांना टाकले मागे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील वास्तवकेवळ ०.१ टक्के पुरुषांनी केली नसबंदी कुटुंब नियोेजनासंदर्भात महिला जितक्या जागृत आहेत तेवढे पुरुष जागृत नसल्याचे स्पष्ट होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील केवळ ०.१ टक्के पुरुषांनी कुटुंब नियोजनासाठी नसबंदी मार्ग अवलंबला आहे. शहरात हे प्रमाण ०.२ टक्के इतके आहे.