शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुद्रांक शुल्कासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:37 IST

राज्यात प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मनौती (कमिशन) मिळावे, .....

ठळक मुद्देपरवानाधारक गेले संपावर : प्रशासनाचा प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मनौती (कमिशन) मिळावे, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील परवानाधारक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. दरम्यान प्रशासनाने हा संप मागे घेण्याबाबत प्रयत्न करून पाहिला मात्र ते निष्फळ ठरले. या संपामुळे नागरिकांना मुद्रांकासाठी धावपळ करावी लागली.१० टक्के मनौतीसह राज्यात सुरू असलेली ई-चालान तसेच ई-एसबीटीआर ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी, मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसास परवाना मिळावा, या मागण्यांसाठी राज्यभरातील मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. याच मागण्यांसाठी विदर्भातील परवानाधारक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी काही दिवसांपूर्वीच संप पुकारला होता, हे विशेष.या संपात नागपुरातील सर्व परवानाधारक मुद्र्रांक शुल्क विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना मुद्रांक शुल्कासाठी धावपळ करावी लागली. अखेर संप असल्याचे माहिती झाल्यावर अनेकांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागले.विदर्भ लायसन्सधारक मुद्रांक विक्रेता संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तहसील कार्यालयासमोर परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवून निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील, ताराचंद्र शेळके, विजय क्षीरसागर, प्रभू नरडे, शोभा वंजारी, गणेश भोयर, संजय हरडे, भूषण बोकडे, नारायण मोहाडीकर, विजय खोकले, पी.पी. ठाकरे, रत्नमाला कावरे, तारा वारकर आदींसह सर्वच मुद्रांक शुल्क विक्रेते संपात सहभागी होते.२५ लाखाचे नुकसानदरम्यान, मुद्र्रांक शुल्क विक्रेत्यांच्या संपामुळे पहिल्या दिवशी जवळपास २५ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. हा संप बेमुदत आहे तसेच राज्यव्यापी आहे. तेव्हा या त्यांच्या मागणयांबाबत गांभीर्याने विचार न केल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.