शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांसाठी पाच वर्षे कार्यकाळ निश्चित करणारा नियम रद्द; हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 21:21 IST

महाविद्यालयांच्या प्राचार्यांकरिता पाच वर्षे कार्यकाळ निश्चित करणारा नियम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकतर्फी व घटनाबाह्य ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मनीष पितळे यांनी हा निर्वाळा दिला.

ठळक मुद्देविद्यापीठ अनुदान आयोगाला दणका, प्राचार्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविद्यालयांच्या प्राचार्यांकरिता पाच वर्षे कार्यकाळ निश्चित करणारा नियम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकतर्फी व घटनाबाह्य ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मनीष पितळे यांनी हा निर्वाळा दिला. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाला जोरदार दणका बसला असून प्राचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.वादग्रस्त नियम २०१० पासून लागू करण्यात आला होता. त्यानुसार प्राचार्यांची केवळ पाच वर्षे कार्यकाळाकरिता नियुक्ती करता येत होती. तसेच, त्यात केवळ एकदा पुनर्नियुक्तीची तरतूद होती. पुनर्नियुक्तीकरिता समान प्रक्रियेची पुनरावृत्ती करणे आवश्यक होते. अशाप्रकारे एक प्राध्यापक कमाल १० वर्षाकरिता प्राचार्यपदी कार्य करू शकत होता. आता उच्च न्यायालयाने हा नियम अवैध ठरवल्यामुळे सध्या कार्यरत प्राचार्यांना पूर्वीप्रमाणे सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत, म्हणजे वयाच्या ६२ वर्षापर्यंत या पदावर कायम राहता येणार आहे. या नियमाच्या वैधतेला डॉ. सुरेश रेवतकर, डॉ. अमिर धमानी, डॉ. मृणाल काळे, डॉ. प्रकाश मेश्राम, डॉ. हिराजी बनपुरकर, डॉ. सुरेश बाकरे, डॉ. राजीव वेगिनवार, डॉ. अनिल कोरपेनवार, डॉ. राजेश सिंगरू, डॉ. संजीव पाटनकर व डॉ. सुरेश खंगार यांनी आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.निर्णय तीन महिन्यासाठी स्थगितविद्यापीठ अनुदान आयोग या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्यामुळे आयोगाच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने हा निर्णय तीन महिन्यासाठी स्थगित ठेवला आहे. तसेच, यादरम्यान सध्या कार्यरत असलेल्या प्राचार्यांना कार्यकाळ संपला म्हणून पदावरून कमी करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा लाभ सध्या कार्यरत असलेल्या प्राचार्यांनाच मिळेल. कार्यकाळ संपलेल्या प्राचार्यांना या निर्णयाच्या आधारे पदावर परत घेण्याचा दावा करता येणार नाही असे उच्च न्यायालयाने ठळकपणे सांगितले.

 

टॅग्स :Courtन्यायालय