शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

औषधांसाठी धावाधाव

By admin | Updated: May 31, 2017 02:50 IST

आॅनलाईन फार्मसी व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात...

विक्रेत्यांच्या संपाने वैद्यकीय सेवा विस्कळीत : मेयो, मेडिकलचे ६० टक्के रुग्ण अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आॅनलाईन फार्मसी व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने मंगळवारी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील बहुसंख्य औषध दुकाने बंद होती. परिणामी, रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांवर औषधींसाठी धावाधाव करण्याची वेळ आली. सर्वात जास्त फटका बसला तो ‘इमरजन्सी’ रुग्णांना. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केवळ ४० टक्केच औषधे मिळत असल्याने इतर औषधांच्या खरेदीसाठी नातेवाईकांची तारांबळ उडाली. ‘आॅनलाईन व ई फार्मसी’मधून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या, नार्कोटिक्स ड्रग्ज, कोडीन सिरप आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकणार असल्याने व या माध्यमातून औषधांचा दुरुपयोग होण्याची जास्त शक्यता असल्याचे कारण समोर करीत याला विरोध म्हणून ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने मंगळवारी संपाची हाक दिली. संघटनेचे महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १०० टक्के बंद यशस्वी राहिला. नागपूर जिल्ह्यातील ३२०० औषधांची दुकाने बंद होती, असा दावाही त्यांनी केला. हा संप रुग्णांना वेठीस धरण्यासाठी नव्हता तर जनतेचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होता. म्हणूनच असोसिएशनतर्फे गांधीबाग येथील औषधे बाजारात इमरजन्सी रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. दरम्यान सकाळी ११ वाजतापासून संविधान चौकात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’च्यावतीने औषध विक्रेत्यांनी धरणे-आंदोलन केले. दुपारी २ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, हरीश गणेशानी, राजेंद्र कावडकर, राजीव उखरे,धनंजय लेले, सचिन अंबागडे, मनोज देशमुख, मनीष गुप्ता आदींचा सहभाग होता. सकाळपासून औषधांची दुकाने बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. औषधे न मिळाल्याच्या तक्रारी नाहीत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या आव्हानामुळे शहरात शंभरावर औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. शिवाय ज्यांना औषधे मिळाली नाही त्यांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले होते, परंतु एकाही अधिकाऱ्यांना या संदर्भात फोन आलेला नाही. ‘लोकमत’ने सुरू असलेल्या औषध दुकानांचे पत्ते प्रसिद्ध केल्यामुळे अनेकांना मदतही झाली. -मोहन केकतपुरे , सहआयुक्त, औषध प्रशासन शेकडोंना उपलब्ध करून दिली औषधे एकदिवसीय संप असला तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून असोसिएशनने गांधीबाग येथील औषध बाजारातून ‘इमर्जन्सी’ रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून दिली होती. सकाळी ८ वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधे वितरित करण्यात आली. यात खासगी इस्पितळांसह मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयातीलही रुग्ण होते. -हरीश गणेशानी, सदस्य, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना