शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ ऑनलाइन, तरी दलालांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध, सुनियोजित पद्धतीने, अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन ...

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध, सुनियोजित पद्धतीने, अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाइन’प्रणाली आत्मसात केली; परंतु सात वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रणालीचा फायदा सामान्यांना कमी आणि दलालांनाच जास्त होत असल्याचे चित्र आहे. याचे वास्तव म्हणजे, आरटीओ कार्यालयाच्या आत व परिसरात फोफावलेले अनधिकृत ‘ऑनलाइन सेंटर’. याच्या आड दलालांचा व्यवसाय जोरात सुरू आहे.

पूर्वी आरटीओ कार्यालयात दलालांशिवाय काडीही हलत नव्हती, असे चित्र होते. आजही यात फारसा बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, कार्यालयातील गर्दी, तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची येत असलेली वेळ, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी व दलालांना दूर ठेवण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली. २०१४ मध्ये नागपुरात या प्रणालीला शिकाऊ वाहन परावान्यापासून सुरुवात झाली. नंतर पक्के वाहन परवाने, ई-पेमेंट व इतरही कामकाजांचा समावेश करण्यात आला. नुकतेच घरी बसूनच ऑनलाइन लर्निंग लायसन्स परीक्षा देण्याची सोयही उपलब्ध झाली. सध्याच्या स्थितीत ‘ऑनलाइन’मार्फत कार्यालयातील ५० वर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु बहुसंख्य नागरिकांना ‘वेबसाइट’चे नावच माहिती नाही, येथून सुरुवात आहे. यामुळे पूर्वी आरटीओच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहून ‘कोणते काम आहे’ अशी विचारणा करणाऱ्या दलालांनी आता कार्यालयासमोर पानटपऱ्यांसारखी दुकाने मांडून ‘ऑनलाइन सेंटर’च्या आड दलाली करीत आहे. यात मोठा फायदा असल्याने तिन्ही आरटीओ कार्यालयांचा परिसर या सेंटरच्या विळख्यात सापडला आहे.

-किचकट प्रणालीमुळे नाइलाजाने दलालांची मदत

‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर वाहन परवाना काढण्यापासून परवाना नूतनीकरण करणे, शुल्क भरणे, कागदपत्रे डाऊनलोड करून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची सोय आहे; परंतु या किचकटप्रणालीमुळे संगणकाचे ज्ञान असलेल्या लोकांनाही यात अडचणी येतात. शिवाय कागदपत्रे डाऊनलोड करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, त्याची प्रिंट काढणे आदींची अनेकांकडे सोय राहत नाही. यामुळे नाइलाजाने अनेकांना आरटीओ कार्यालयासमोरील दलालांच्या ऑनलाइन सेंटरवरच यावे लागत असल्याचे वास्तव आहे.

-अधिकारीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या हाताखाली दलाल

आरटीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे विविध कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर होणारी गर्दी रांगेत लावण्यासाठी, दलालांकडून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी, दलालांकडून पैसे जमा करण्यासाठी व अधिकाऱ्यांची छोटी-मोठी कामे करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी दलाल ठेवून घेतले आहेत. अधिकाऱ्यांचे पाहून कर्मचाऱ्यांच्याही हाताखाली दलाल वावरत असल्याचे आरटीओ कार्यालयाचे चित्र आहे.

-दलालांकडून दुप्पट-तिप्पट शुल्क वसूल

शिकाऊ दुचाकी वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेण्याचे शुल्क २०१ रुपये असताना दलाल याच्या अडीच पट शुल्क आकारतात. परमनंट दुचाकी वाहन परावान्याचे शुल्क ७६६ रुपये असताना दलाल १५०० रुपये घेतात. वाहन परवाना नूतनीकरणाचे शुल्क ४६६ रुपये असताना दलाल १००० रुपये घेतात. विशेष म्हणजे, ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी दलाल १०० रुपयांची मागणी करतात.

-दलालांकडून गेल्यास झटपट कामे

उमेदवाराच्या अर्जावर दलालाचा स्टॅम्प किंवा विशिष्ट नाव लिहून असल्यास त्या अर्जदाराची कामे लवकर होत असल्याचे आरटीओमधील वास्तव आहे. काहींना तर रांगेतही लागावे लागत नाही. सध्या आरटीओ कार्यालयात १०० वर दलाल कार्यरत आहेत.