शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आरटीओच्या निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: January 17, 2015 02:39 IST

राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले.

नागपूर : राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. याला २४ तास होत नाही तोच दलालांकडून आरटीओच्या वाहन निरीक्षकाना धमक्या मिळणे सुरू झाले आहे. शुक्रवारी शहर आरटीओ कार्यालयात पक्क्या वाहन चाचणी परीक्षेत नापास केल्याच्या कारणावरून एका सहायक मोटार वाहन निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता शहर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या उमेदवारांची पक्क्या वाहन चाचणीची परीक्षा सुरू होती. वाहन चाचणी परीक्षेत वाहनचालकांकडून २४ नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. नियम पाळणाऱ्यानाच पास करण्याचे कार्यालयाचे निर्देश आहे. त्यानुसार सहायक मोटार वाहन निरीक्षक मोहोड उमेदवारांची परीक्षा घेत होते, तो कुठे चुकत आहे त्याची नोंदही घेत होते. याचवेळी सोनू नावाचा दलाल आला. तुम्ही अनेक जणांना नापास करीत आहात, असे बोलून मोहोड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्याने पाहून घेण्याची धमकीही दिली. मोहोड यांनी या विषयी वरिष्ठांना माहिती दिली. सूचनेनुसार त्यांनी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित दलालाच्या विरोधात तक्रार दाखल केली. सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास त्या दलालाने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कार्यालयाकडून रात्री उशिरापर्यंत अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू होती. या घटनेला घेऊन परिवहन आयुक्तांचे आदेशांचे कसे पालन करावे, असा प्रश्न आरटीओ अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)