शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ : सात सहायक निरीक्षकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:22 IST

‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे.

ठळक मुद्देव्हीआयपी कोट्यातील शिकाऊ वाहन परवाने प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे. या घटनेने आरटीओ क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात ‘व्हीआयपी’ कोट्यातून सुमारे सव्वा लाख परवाने देण्यात आले. परंतु कारवाई केवळ नागपुरातच होत आहे. यामुळे उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.वाहन परवानाला आवश्यक असलेल्या ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’साठी लागणारा कालावधी, यामुळे लोकांचा वाढात रोष, यावर उपाय म्हणून कार्यालयीन वेळेच्या आधी आणि नंतर व आवश्यक तेथे सुटीच्या दिवशी चाचणीचे कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले होते. ज्या उमेदवाराला मुदत संपणाऱ्या तारखेनंतर अपॉईंटमेन्ट मिळत असेल अशा उमेदवारांना गैरहजर राहणाऱ्यांच्या जागी समायोजित करण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या. अशा उमेदवारांना ‘व्हीआयपी’ कोट्यातून परवाना देणे सुरू झाले. जून २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्यात सुमारे सव्वा लाख परवाने ‘व्हीआयपी’ कोट्यातून देण्यात आले. नागपुरातील सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यांसह आठ दलालांनी हे परवाने देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबत सायबर सेलने आपला अहवाल सादर केला. अहवाल प्राप्त होऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याचीही तक्रार दाखल झाली. याची दखल परिवहन आयुक्तांनी घेतली. त्यांनी शहर आरटीओ कार्यालयाला संबंधितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे पत्र दिले. आरटीओ कार्यालयाने या संदर्भातील एक पत्र सीताबर्डी पोलीस ठाण्याला दिले. परंतु आरटीओने फिर्यादी म्हणून कुणालाच समोर केले नव्हते. यामुळे दोन दिवस होऊनही गुन्हे दाखल झाले नव्हते. अखेर शुक्रवारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला फिर्यादी म्हणून सादर केल्याने सीताबर्डी पोलीस ठाण्याने रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPolice Stationपोलीस ठाणे