शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकावर आरटीओचा अविश्वास!

By admin | Updated: September 6, 2015 02:42 IST

शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) नुकताच पदभार स्वीकारलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी स्वत:च्याच भरारी पथकावर अविश्वास दाखविला आहे.

ओव्हरलोडवर कारवाईसाठी पथकाची अदलाबदलनागपूर : शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) नुकताच पदभार स्वीकारलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी स्वत:च्याच भरारी पथकावर अविश्वास दाखविला आहे. ओव्हरलोडवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी शहर आरटीओचे भरारी पथक वर्धेला तर वर्धेच्या पथकाला शहरात कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले आहे. क्षमतेपेक्षा जादा भार (ओव्हरलोड) घेऊन जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी गेल्या महिन्यात नागपुरात येऊन दिले होते. त्यांनी प्रत्येक आरटीओ कार्यालयाला ओव्हरलोडचे दुप्पट लक्ष्यही दिले आहे. या कारवाईत स्थानिक आरटीओच्या भरारी पथकाकडून वाहतूकदारांना अर्थपूर्ण सवलत मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन, या पथकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आकस्मिक भेटी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. परिणामी, नागपुरातील शहर व ग्रामीण आरटीओ पथकाने ही मोहीम गंभीरतेने घेतली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातील ओव्हरलोडवर कारवाईची संख्या पाहता समाधानकारक आहे. असे असताना पवार यांनी ओव्हरलोड वाहनांवर आणखी प्रभावी कारवाईसाठी भरारी पथकाची अदलाबदल केली. मात्र, पथकातील मोटार वाहन निरीक्षकांमध्ये या प्रकाराचे नाराजीचे सूर उमटत आहे. सूत्राने सांगितले, १३ सप्टेंबरपर्यंत वर्धेतील पथक शहरातील ओव्हरलोडवर तर शहरातील वायुपथक वर्धेतील ओव्हरलोडवर कारवाई करेल. (प्रतिनिधी)