शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

म्हणे स्वामी विवेकानंदांची जयंती ११ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वाद यांचे एक अनोखे समीकरण आहे. अनेकदा विद्यापीठाच्या निर्णयांवरून वाद होतात. मात्र आता तर विद्यापीठाने स्वत:च वादात उडी घेतली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा जावईशोधप्रशासन कुंभकर्णी झोपेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वाद यांचे एक अनोखे समीकरण आहे. अनेकदा विद्यापीठाच्या निर्णयांवरून वाद होतात. मात्र आता तर विद्यापीठाने स्वत:च वादात उडी घेतली आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र नागपूर विद्यापीठाने चक्क ११ सप्टेंबर ही स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्याचा शोध लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भातील अधिकृत पत्रदेखील सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहेत.११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक धर्मसंसदेत ऐतिहासिक भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला सव्वाशे वर्ष होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस दिग्विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवावर्गाचे आदर्श आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव डॉ. निरंजन देशकर यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला होता व परिषदेने याला संमती दिली होती.त्यानुसार विद्यापीठाने परिपत्रक जारी केले व हा दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयांना विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी पत्रदेखील पाठविले. यादिवशी विवेकानंद यांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यात येणार आहे. मात्र या पत्रानेच सर्व घोळ केला. ११ सप्टेंबर २०१८ रोजी स्वामी विवेकानंद यांची १२५ वी जयंती विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ म्हणून साजरी करण्यात यावी, असे या पत्रात नमूद आहे.महाविद्यालयांकडून आश्चर्य, विद्यार्थी संघटनांचे मौननागपूर विद्यापीठाने इतकी मोठी घोडचूक केल्यामुळे महाविद्यालयांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे पत्र पाठविणे हे प्रशासनाचा अभ्यास नसल्याचे दर्शवित आहे, अशी भावना एका प्राचार्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे विद्यार्थी संघटनांनीदेखील या जावईशोधावर मौन बाळगले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ