शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

By योगेश पांडे | Updated: March 22, 2025 00:01 IST

बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती.

योगेश पांडेनागपूर : बांगलादेशमधीलहिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती. मात्र, तरीदेखील अजूनही तेथील हिंदूंना टार्गेट केले जात असून, त्यांच्यात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनबांगलादेशमधील अत्याचाराविरोधात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू-अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ‘ग्लोबल’ आवाज उचलला जावा, यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

शुक्रवारपासून बंगळुरू येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. या सभेत दोन प्रस्तावांवर सखोल मंथन होणार आहे. संघ स्थापनेच्या शतकवर्षानिमित्त या सभेला महत्त्व आले असून, या वर्षातील कार्यक्रमांच्या नियोजनावर, तर चर्चेला सुरुवात झालीच आहे. सोबतच बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सार्वजनिक मंचावरून याची निंदा केली होती. संघ स्वयंसेवकांनी शक्य त्या पद्धतीने तेथील हिंदू व अल्पसंख्याकांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर संघाकडून हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचे नियोजन अखिल भारतीय प्रतिनीधी सभेत करण्यात येणार आहे. जागतिक समुदायाने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, अशी संघाची भूमिका आहे व त्यादृष्टीनेच आता पुढील पावले उचलण्यात येतील.

बांगलादेशमधील घटना ही मानवतेवर काळिमासंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बांगलादेशमध्ये सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे. तेथील घटना सुसंस्कृत समाजातील मानवतेच्या आणि लोकशाहीच्या कोणत्याही मानकांनुसार लज्जास्पद आहेत. तेथील स्थिती अद्यापही गंभीर असून तेथील हिंदू व अल्पसंख्याकांनी या स्थितीतदेखील दाखविलेली हिंमत नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भूमिका संघाने मांडली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेने प्रयत्न करावे, असे आवाहन संघाकडून परत एकदा करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये मैतेई-कुकींमध्ये ‘संवादसेतू’ साधणारबांगलादेशसोबतच मणिपूरमधील हिंसाचाराबाबतदेखील संघाने चिंता व्यक्त केली आहे. तेथील विविध आदिवासी व जनजातीय समूहांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: मैतेई व कुकी समुदायाला एका मंचावर आणून त्यांच्यात संवादसेतू प्रस्थापित करण्यावर संघाकडून भर देण्यात येत आहे. दोन्ही समुदायांचे नेत्यांशी संघाचे अखिल भारतीय पातळीवरील अधिकारी संपर्कात आहेत. तसेच इंफाळ, गुवाहाटी व दिल्ली येथे बैठकादेखील झाल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू